मुगाच्या डाळीची भजी कडक होतात, घास लागतो? ५ टिप्स- भजी होतील क्रिस्पी-मऊ
Updated:August 3, 2025 19:06 IST2025-08-03T18:50:18+5:302025-08-03T19:06:21+5:30
Best pakora batter mix : Street style moong dal bhaji: Monsoon snack recipe: कुरकुरीत- मऊ मुगाच्या डाळीची भजी करायची असेल तर या टिप्स लक्षात ठेवा.

पावसाळा आणि भजीच कॉम्बिनेशनच वेगळं. गरमागरम चहासोबत भजी खाण्याची मज्जा काही वेगळीच. अनेकदा भजी करताना ती कडक होतात किंवा घशामध्ये फसतात, तेलही जास्त लागते. (Best pakora batter mix )
भजी जितकी जास्त कुरकुरीत असतात तितकीच जास्त चांगली त्याची चव असते. अनेकदा मुगाच्या डाळीची भजी करताना ती कडक होतात किंवा घशामध्ये अडकतात. इतकेच नाही तर त्यांना पाणी सुटते ज्यामुळे ते नरम देखील पडतात. आपल्यालाही कुरकुरीत- मऊ मुगाच्या डाळीची भजी करायची असेल तर या टिप्स लक्षात ठेवा. (Street style moong dal bhaji)
मुगाच्या डाळीची भजी बनवताना सगळ्यात आधी ती डाळ पाण्यात भिजवा. पाणी न घालता त्याची पेस्ट तयार करा. पीठ चांगले फेटून घ्या. पाण्यात पीठाचा छोटा गोळा घाला, पीठ तरंगू लागले की ते व्यवस्थित मऊ झाले असं समजावे.
भजी मऊ आणि कुरकुरीत होण्यासाठी पीठात थोडे तांदळाचे पीठ घाला.
पीठात चिमूटभर बेकिंग सोडा घातल्याने भजी कुरकुरीत होतात.
भजी कुरकुरीत आणि तेलकट बनवायची नसतील तर पिठात थोडे गरम तेल घाला.
भजी तळण्यापूर्वी पॅनमध्ये तेल चांगले गरम करा. नंतर मंद आचेवर तळा, यामुळे ती अधिक कुरकुरीत होतील आणि घशात अडकणार देखील नाही.