Join us

भात गचका- चिकट होतो? ४ सोप्या टिप्स, भात होईल मोकळा मऊ दाणेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2025 17:06 IST

1 / 7
जेवताना आपल्या प्रत्येकाच्या ताट वरण-भात हा असतो. गरमागरम वरण-भात आणि त्यावर साजूक तूप. सगळ्यात सोपा आणि काही मिनिटात तयार होणारा भात हा आवर्जून सगळे खातात.(How to make rice non-sticky)
2 / 7
भाताचे अनेक प्रकार आहे. साधा भात, जिरा भात, फोडणीचा भात, पुलाव, बिर्याणी आणि इतर विविध पदार्थ. परंतु, अनेकदा कितीही महागातला तांदूळ घेतला तरी भात गचका होतो किंवा तो चिकट बनतो. (Fluffy rice cooking tips)
3 / 7
भात बनवताना आपण काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या तर तो मोकळा आणि सुटसुटीत होईल.
4 / 7
२ कप तांदळासाठी १ कप पाणी पुरेसे असते. त्यानंतर कुकरच्या तीन शिट्ट्या काढा. यामुळे तांदूळ नीट व्यवस्थित शिजेल आणि मोकळा भात तयार होईल.
5 / 7
लिंबू आणि नारळाच्या तेल बासमती तांदूळ बनवताना वापरल्यास फायदेशीर असते. तांदळात दोन चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा नारळाचे तेल घालून शिजवा.
6 / 7
बासमती तांदूळ बनवताना एक चमचा तूप आणि लोणी देखील वापरुन मऊ-मोकळा भात बनवता येईल.
7 / 7
भात बनवताना पाण्याचा अंदाज नीट घ्या. मोजमाप न करता पाणी टाकले तर भात अधिक चिकट आणि गचका होतो. कुकरमध्ये तांदूळ शिजवत असाल तर पाण्याचे प्रमाणही पाहा.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.