इडलीचटणीचा करा बेत पाहा बिनानारळाची चविष्ट लाल चटणी-रेसिपी सोपी आणि चव एकदम खास
Updated:February 24, 2026 16:48 IST2026-02-24T15:56:38+5:302026-02-24T16:48:28+5:30
How To make Red Chutney Without Using Coconut : एक भांड्यात १ चमचा तेल गरम करून त्यात उडीद डाळ, लसूण पाकळ्या आणि लाल मिरच्या खमंग परतवून घ्या.

नारळ न वापरता लाल चटणी अधिक चविष्ट चवदार आणि हॉटेलसारख्या चवीची होण्यासाठी काही टिप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. (How To make Red Chutney Without Using Coconut)
साहित्य
२ कांदे, २ टोमॅटो, ६ ते ७ सुक्या लाल मिरच्या, ८ ते १० लसूण पाकळ्या, १ चमचा उडीद डाळ, १ छोटा खडा चिंच, मीठ आणि फोडणीसाठी तेल, मोहोरी, कढीपत्ता आणि हिंग (How To Make Red Chutney At Home)
एक भांड्यात १ चमचा तेल गरम करून त्यात उडीद डाळ, लसूण पाकळ्या आणि लाल मिरच्या खमंग परतवून घ्या.
यात चिरलेला कांदा घालून तो पारदर्शक होईपर्यंत परतवून ग्या आणि त्यानंतर टोमॅटो घालून ते पूर्णपणे मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.
चवीसाठी यामध्ये चिंचेचा छोटा तुकडा नक्की घाला. यामुळे चटणीला इडलीसोबत लागणारा परफेक्ट टँगी फ्लेवर येतो.
शिजलेलं मिश्रण गॅसवरून उतरवून पूर्णपणे थंड होऊ द्या. कारण गरम असतानाच वाटल्यास चटणीचा रंग बदलू शकतो.
थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्याच चवीनुसार मीठ घालून अगदी थोडं पाणी घाला आणि जाडसर किंवा बारीक पेस्ट तयार करा.
एक लहान कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, कढीपत्ता आणि चिमूटभर हिंगाची खमंग फोडणी द्या आणि ती तयार चटणीवर ओता. हॉटेलसारखा गडद लाल रंग हवा असल्यास, वाटताना किंवा फोडणी देताना अर्धा चमचा कश्मिरी मिरची पावडर घाला.