पोहे चिकट होतात तर कधी वातड लागतात? ७ टिप्स, मऊ-मोकळे चवदार पोहे होतील घरीच
Updated:October 24, 2025 18:29 IST2025-10-24T18:06:51+5:302025-10-24T18:29:03+5:30
How To Make Poha : पोहे केल्यानंतर लिंबाचा रस आणि कोथिंबीर नेहमी शेवटी घाला. ज्यामुळे पोह्यांना चव चांगली येईल.

फोडणीचे पोहे करण्यासाठी नेहमी जाड पोहे वापरा (Poha Making Tips). पातळ पोहे चिवड्यासाठी चांगले असतात त्यामुळे पोहे गचके होतात. ( How To Make Soft Poha Perfect Poha Making Tips)
पोहे जास्त वेळ पाण्यात भिजवू नका. ज्यामुळे त्याचा लगदा होतो. पोहे एका मोठ्या स्टिलच्या चाळणीत घ्या आणि नळाच्या पाण्याखाली १ ते २ वेळा धुवून घ्या. (How To Make Soft Poha Perfect Poha)
धुतल्यानंतर चाळणीतील जास्तीचं पाणी काढून टाका. पोहे फक्त ओले झाले पाहिजे. पाण्यात जास्त बुडालेले नको.
पाणी पूर्णपणे निथळल्यानंतर पोहे ५ ते ७ मिनिटं झाकून ठेवा ज्यामुळे आपोआप मऊ होतात आणि मोकळे राहतात.
पोहे भिजत ठेवल्यावर त्यात चवीनुसार मीठ, साखर आणि हळद घालू शकता यामुळे हळद पोह्यांना एकसमान लागते आणि पोहे मऊ होतात.
पोहे नेहमी मंद आचेवर शिजवा, जास्त आचेवर शिजवल्यास कडक किंवा चिवट होतात.
काही लोक फोडणीत अगदी थोडं पाणी घालतात मग पोहे घालतात ज्यामुळे पोहे अगदी मऊ होतात.
फोडणी तयार झाल्यावर त्यात भिजवलेले पोहे घालून हलक्या हातानं हळूवार मिसळा. पोहे फोडणीत घातल्यानंतर ते जास्तवेळ परतू नका. झाकण ठेवून २ ते ३ मिनिटं वाफवा म्हणजे व्यवस्थित गरम होतील.