1 / 6थंडीचा गारवा आणि गरमागरम जेवण कुणाला आवडणार नाही. गव्हाच्या पीठापासून बनवणाऱ्या चपात्या आपल्या रोजच्या आहारातील भाग. पण पुरी हा पदार्थ बनवताना अनेकदा जास्त तेलकट किंवा कडक होतात. त्यामुळे सणसमारंभ किंवा खाण्याची अचानक इच्छा झाली तरी आपण पुरी बनवणे टाळतो. (Puffed puri recipe)2 / 6जर आपल्यालाही टम्म, मऊ पुऱ्या घरीच बनवायचा असतील तर पिठात एक गोष्ट मिसळा. ज्यामुळे पुऱ्या जराही तेलकट होणार नाही. (Soft puri dough secret)3 / 6पुऱ्यासाठी कणिक मळताना त्यामध्ये थोडेसे तांदळाचे पीठ घाला. यामुळे पुरी जास्त तेलकट किंवा कडक होत नाही. 4 / 6तांदळाच्या पीठाने तेल कमी शोषले जाते. तांदळाच्या पिठामुळे जास्त ग्लूटेन तयार होत नाही. यामुळे पीठ अधिक लवचिक होण्यापासून रोखले जाते आणि पुरी कमी तेल शोषते. 5 / 6तांदळाच्या पीठामुळे पुऱ्यांना छान चव येते. तसेच त्या एकसारख्या फुगतात. थंड झाल्यानंतरही पुऱ्या मऊ राहतात. 6 / 6कणिक मळताना गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ एकत्र करा. यात मीठ आणि थोडे तेल किंवा तूप घालून कणिक मळा. ज्यामुळे पुऱ्या मऊ राहातील आणि टम्म फुगतील.