९० टक्के लोक चहा करताना 'ही' चूक करतात;५ टिप्स -टपरीसारखा घट्ट, फक्कड चहा घरीच करा

Updated:September 2, 2025 12:13 IST2025-09-02T12:03:36+5:302025-09-02T12:13:43+5:30

How To Make Perfect Tea At Home, How To Make Milk Tea : चहा करण्यासाठी उघड्या भांड्याचा वापर करा. ज्यामुळे चहा पावडर चांगली मिसळते आणि रंगही चांगला येतो.

९० टक्के लोक चहा करताना 'ही' चूक करतात;५ टिप्स -टपरीसारखा घट्ट, फक्कड चहा घरीच करा

अनेकांना चहा करणं सोपं वाटतं पण परफेक्ट चहा करणं ही एक कला आहे(Make Perfect Tea At Home). कधीतरी चहा खूपच गोड होतो तर कधी दूध जास्त झाल्यानं चव बिघडते तर कधी चहा पावडर जास्त होते. परफेक्ट चहा कसा करायचा याच्या काही टिप्स आणि ट्रिक्स पाहूया. या ट्रिक्स तुम्ही वापरल्या तर टपरीसारखा परफेक्ट, मसालेदार चहा घरीच बनेल. (Tapristyle Tea Making Tips)

९० टक्के लोक चहा करताना 'ही' चूक करतात;५ टिप्स -टपरीसारखा घट्ट, फक्कड चहा घरीच करा

चहा करण्यासाठी साधारण १:२ या प्रमाणात पाणी आणि दूध वापरावे. जर तुम्ही १ कप पाणी घेत असाल तर २ कप दूध घाला. दूध उकळं की चहा पावडर घाला.(Tea Making Hacks)

९० टक्के लोक चहा करताना 'ही' चूक करतात;५ टिप्स -टपरीसारखा घट्ट, फक्कड चहा घरीच करा

जर तुम्हाला आल्याचा चहा करायचा असेल तर पाणी किंवा दूध उकळायला ठेवल्यानंतर त्यात किसलेलं आलं, वेलची किंवा मसाले घाला. पाण्यात चहा ठेवत असाल तर चहा पावडरचा रंग व्यवस्थित आल्यानंतरच दूध घाला.

९० टक्के लोक चहा करताना 'ही' चूक करतात;५ टिप्स -टपरीसारखा घट्ट, फक्कड चहा घरीच करा

चहाला चांगला कट येऊ द्या. दूध घातल्यानंतर चहा पुन्हा ३ ते ४ मिनिटं उकळवून घ्या. चहाचा रंग लाल होईपर्यंत उकळवणं आवश्यक आहे. यालाच कट येणं म्हणतात. चहा व्यवस्थित उकळल्यानंतर गॅस बंद करा.

९० टक्के लोक चहा करताना 'ही' चूक करतात;५ टिप्स -टपरीसारखा घट्ट, फक्कड चहा घरीच करा

चहा करण्यासाठी उघड्या भांड्याचा वापर करा. ज्यामुळे चहा पावडर चांगली मिसळते आणि रंगही चांगला येतो. चहा पावडर आणि साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवा.

९० टक्के लोक चहा करताना 'ही' चूक करतात;५ टिप्स -टपरीसारखा घट्ट, फक्कड चहा घरीच करा

फ्रिजमधून बाहेर काढलेलं दूध चहात लगेच घालू नका यामुळे चहाची चव पांचट होते. फ्रिजमधून थोडावेळ बाहेर काढून नंतर दूध चहात घाला.

९० टक्के लोक चहा करताना 'ही' चूक करतात;५ टिप्स -टपरीसारखा घट्ट, फक्कड चहा घरीच करा

चहा झाल्यानंतर लगेच गाळण्याऐवजी १ मिनिटं झाकून ठेवून नंतर तुम्ही गाळू शकता. यामुळे वाफ चांगली फिरते.चहाला चांगला सुगंध येतो.