उपमा बिघडतो-गचका होतो,बेचव लागतो? ७ टिप्स,नाश्त्याला मऊसूत उपमा करा घरीच
Updated:September 4, 2025 20:36 IST2025-09-04T20:28:52+5:302025-09-04T20:36:42+5:30
How To Make Perfect Soft Upma : फोडणीतच मीठ आणि थोडी साखर घातल्यास उपम्याला चांगली चव येते. यामुळे मीठ सर्व उपम्यात एकसारखे मिसळले जाते.

नाश्त्याला उपमा खायला सर्वांनाच आवडतो (How To Make Perfect Soft Upma). पण प्रत्येकालाच चांगला उपमा बनवता येतोच असं नाही. कधी उपमा गचगचीत होतो तर कधी जास्तच कोरडा लागतो. हॉटेलमध्ये मिळतो तसा चवदार, चविष्ट उपमा करण्यासाठी खास ट्रिक्स पाहूया.
उपमा करण्यासाठी रवा नीट भाजावा. रवा मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत आणि सुगंध सुटेपर्यंत भाजणे खूप महत्त्वाचे आहे. (Soft Upma Making Tips Upma Making Tricks)
उपमा चिकट होण्याचे दुसरे कारण म्हणजे पाण्याचे जास्त प्रमाण.साधारणपणे, एक वाटी रव्यासाठी दोन ते अडीच वाटी गरम पाणी पुरेसे असते.
थंड पाणी वापरल्यास उपमा नीट फुलत नाही आणि कोरडा राहतो. त्यामुळे पाणी नेहमी उकळूनच वापरावे.
फोडणीतच मीठ आणि थोडी साखर घातल्यास उपम्याला चांगली चव येते. यामुळे मीठ सर्व उपम्यात एकसारखे मिसळले जाते.
मोहरी, कढीपत्ता आणि इतर गोष्टी व्यवस्थित तळल्या गेल्या नाहीत तर उपम्याची चव बिघडते.
पमा तयार झाल्यावर त्यावर ओल्या नारळाचा किस घालून सर्व्ह केल्यास त्याला एक गोड आणि उत्तम चव येते.