हॉटेलसारख्या परफेक्ट रवा इडल्या करण्याच्या ८ टिप्स; मऊ, जाळीदार इडली १५ मिनिटांत होईल
Updated:April 3, 2026 20:52 IST2026-04-03T20:42:25+5:302026-04-03T20:52:49+5:30
How To Make Perfect Rawa Idli : इडली पात्राला तेल लावून त्यात बॅटर भरा आणि मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटं वाफवून घ्या.

हॉटेलमध्ये मिळते तशी मऊ, जाळीदार रवा इडली घरी करणं खूपच सोपं आहे. यासाठी नेहमी जाड रवा वापरा, यामुळे इडली चिकट न होता छान फुलते. (How To Make Perfect Rawa Idli)
कढईत थोडं तेल किंवा तूप घालून रवा मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं हलका भाजून घ्या. (7 Pro Tips To Make Rava Idli)
भाजलेला रवा पूर्ण थंड झाल्यावर त्यात ताजं आणि थोडं आंबट दही घाला आणि चवीनुसार मीठ घाला. (Rawa Idli Making Tips)
मिश्रणात थोडं पाणी घालून मध्यम कंसिस्टंसीचं मिश्रण तयार करा. ते किमान 20 ते 30 मिनिटं झाकून ठेवा. जेणेकरून रवा पाणी शोषून घेईल.
हॉटेलसारखी परफेक्ट चव हवी असल्यास बॅटरमध्ये मोहोरी, जीरं, कढीपत्ता, चणा डाळ आणि आल्याची फोडणी द्या.
इडल्या लावण्यापूर्वी अगदी शेवटच्या क्षणी मिश्रणात अर्धा चमचा इनो किंवा खाण्याचा सोडा घालून हलक्या हातानं एकाच दिशेनं फेटून घ्या.
इडली पात्राला तेल लावून त्यात बॅटर भरा आणि मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटं वाफवून घ्या.
इडल्या पूर्ण शिजल्यावर लगेच बाहेर न काढता 2 मिनिटं थंड होऊ द्या. त्यामुळे त्या साच्याला चिकटत नाही आणि सुबक निघतात.