गुळाचा चहा बिघडतो-चहात आधी काय घालायचं? ८ टिप्स, फक्कड गुळाचा चहा घरीच बनेल
Updated:October 14, 2025 15:06 IST2025-10-14T13:51:50+5:302025-10-14T15:06:58+5:30
How To Make Perfect Jaggery Tea : गूळ हा गडद तपकिरी किंवा काळपट रंगाचा असतो. जास्त पिवळा, आकर्षक दिसणारा गूळ टाळा.

चहा (Tea) पूर्ण तयार झाल्यानंतर गॅस बंद करा नंतर मग किसलेला किंवा बारीक केलेला गूळ घाला. गूळ घातल्यानंतर चहा जास्तवेळ उकळवू नका. कारण यामुळे दूध फाटण्याची शक्यता जास्त असते. (Jaggery Making Tips)
गुळाचा मोठा खडा घालण्याऐवजी गूळ किसून किंवा बारीक तुकडे करून घाला. यामुळे लवकर विरघळतो आणि चहा फाटण्याची शक्यता कमी होते.
चहामध्ये थंड दूध घालू नका. दूध वेगळ्या भांड्यात व्यवस्थित गरम करून घ्या. कोरा चहा गाळून एका कपात घ्या नंतर त्यात वरून गरम केलेलं दूध घाला.
पिवळ्या रंगाच्या गुळामध्ये अनेकदा सोडा घातलेला असतो ज्यामुळे चहा फाटू शकतो. म्हणूनच शक्य असल्यास काळ्या किंवा सेंद्रीय गुळाचा वापर करा.
गूळ आणि दूध चहामध्ये घालून जास्तवेळ उकळवू नका. गुळाचा चहा फाटण्याचे कारण म्हणजे दुधामध्ये असलेले आम्ल आणि दुधामधले प्रथिनं यात होणारी रासायनिक क्रिया. उच्च तापमानाला हे मिश्रण एकत्र आल्यास दूध फाटतं.
हा सर्वात महत्वाचा नियम म्हणजे चहा पावडर, आलं आणि मसाला वापरत असाल तर त्यांचा काढा व्यवस्थित उकळवून घ्या.
बाजारात मिळणाऱ्या गुळात जास्त प्रमाणात भेसळ किंवा रासायनिक पदार्थ असतात. ज्यामुळे दूध लवकर फाटतं.
नैसर्गिक गूळ हा गडद तपकिरी किंवा काळपट रंगाचा असतो. जास्त पिवळा, आकर्षक दिसणारा गूळ टाळा.