टोमॅटो न घालता पावभाजी करता येते? पाहा टोमॅटोशिवाय पदार्थ करण्याची भन्नाट युक्ती, महाग टोमॅटोला पर्याय
Updated:July 19, 2024 13:50 IST2024-07-19T13:11:15+5:302024-07-19T13:50:56+5:30

सध्या टोमॅटो खूप महाग झाले आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी एवढे पैसे घालविण्यापेक्षा टोमॅटोशिवाय वेगवेगळे पदार्थ कसे करायचे ते बघा... पदार्थांना वेगळीच चव येईल, सगळ्यांना आवडतील...
टोमॅटो मुख्यत: वरण किंवा आमटी करण्यासाठी वापरला जातो. आमटी किंवा वरणाला असलेली टाेमॅटोची आंबट चव अनेकांना आवडते. पण आता टोमॅटो महाग झाले आहेत तर त्याऐवजी चिंच, आमसूल अशा पदार्थांचा वापर करा.
कोशिंबीरीमध्ये टोमॅटो हवाहवास वाटतो. पण आता त्याऐवजी तुम्ही लिंबू, दही अशा पदार्थांचा वापर करू शकता.
पंजाबी डिशेस करण्यासाठी किंवा मसालेदार भाज्यांची ग्रेव्ही तयार करण्यासाठी कांदा- टोमॅटोची ग्रेव्ही लागते. अशावेळी तुम्ही कांदा जास्त प्रमाणात वापरा. कांद्यासोबत थोडं बीट घ्या आणि त्या मिश्रणाला आंबूसपणा देण्यासाठी त्यात आमचूर पावडर किंवा लिंबू वापरा. भाज्यांना छान रंग तर येईलच पण आमचूर पावडर आणि लिंबाची छान चवही लागेल.
पावभाजीची भाजी टोमॅटोशिवाय होऊच शकत नाही, असं वाटत असेल तर आता ही एक छानशी रेसिपी ट्राय करून पाहा. या रेसिपीमध्येही टोमॅटोऐवजी बीटरुट वापरा. तसेच चवीसाठी लिंबू, आमचूर पावडर टाका. बीटरुटमुळे पावभाजीला छान रंग येईलच. पण तरीही मनासारखा रंग आला नाही तर चिमूटभर खाण्याचा रंग टाका. पावभाजीचा रंग आणि चव एकदम झकास होईल.
टोमॅटोचा आंबुसपणा भाज्यांना छान चव देतो. पण आता टोमॅटो नसेल तर त्याऐवजी लिंबू, दही वापरू शकता. भाज्यांना आणखी छान फ्लेवर येईल.