रात्रीच्या जेवणासाठी करा चटपटीत मसालेदार मटार पुलाव; ७ टिप्स, मोकळा-दाणेदार होईल पुलाव
Updated:December 5, 2025 18:22 IST2025-12-05T16:55:54+5:302025-12-05T18:22:18+5:30
How To Make Matar Pulav : पुलावला चांगला सुगंध येण्यासाठी तूप आणि खडे मसाले वापरा.

मटार पुलाव परफेक्ट होण्यासाठी बासमती तांदूळ निवडा आणि ३० मिनिटं भिजवून ठेवा. (How To Make Matar Pulav)
तांदूळ आणि पाण्याचे प्रमाण १ वाटी तांदळासाठी पाऊण वाटी पाणी असं असावं.
पुलावला चांगला सुगंध येण्यासाठी तूप आणि खडे मसाले वापरा.
पुलावमध्ये ताजे, गोड मटार वापरा. तसंच भात मोकळा होण्यालाठी शिजवताना १ चमचा लिंबाचा रस घाला.
पुलाव मंद आचेवर दम देऊन किंवा कुकरमध्ये १ शिट्टी देऊन लगेच बंद करा.
कुकरचं भांडं लगेच उघडू नका. वाफ पूर्णपणे गेल्यारवरच पुलाव सर्व्ह करा.
तूप आणि मसाल्यांमध्ये तांदूळ काही सेकंद परतवून झाल्यानंतर गरम पाणी त्यात घाला. यामुळे भात शिजण्याची प्रक्रिया एकसमान होते आणि दाणे तुटत नाहीत.