उडपी हॉटेलात मिळते तसे करा इडली-डोसा पीठ, ७ स्टेप्स- इडली कापसासारखी आणि डोसा कुरकुरीत...
Updated:October 15, 2025 18:17 IST2025-10-15T18:01:59+5:302025-10-15T18:17:48+5:30
how to make idli dosa batter udupi style : udupi style idli dosa batter recipe : soft idli and crispy dosa batter recipe : perfect idli dosa batter at home : traditional south indian idli dosa batter : udupi hotel style idli dosa recipe : इडली - डोशाचे बॅटर नेहमीच फसते ? फक्त ७ स्टेप्समध्ये परफेक्ट पद्धतीने करा उडप्यासारखेच बॅटर तयार...

सकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम इडली आणि कुरकुरीत डोसा खायला घरातील (how to make idli dosa batter udupi style) प्रत्येकाला आवडतेच. इडली - डोशासारखे पदार्थ हमखास घरोघरी तयार केले जातात. इडली - डोसा यांसारखे पदार्थ करताना जर त्याचे बॅटर व्यवस्थित आंबवलेले असेल किंवा त्याला परफेक्ट टेक्श्चर आले तरच इडल्या मऊसूत आणि डोसा कुरकुरीत होतो. इडली मऊ, पांढरीशुभ्र आणि डोसा जाळीदार कुरकुरीत होण्यासाठी परफेक्ट बॅटर कसे तयार करावे ते पाहूयात...
'परफेक्ट इडली-डोसा बॅटर'! बॅटर बनवण्याची प्रक्रिया थोडी किचकट वाटत (udupi style idli dosa batter recipe) असली तरी, काही सोप्या स्टेप्स आणि योग्य प्रमाणाचा वापर केल्यास आपणही उडप्याकडे मिळते तशी मऊ, पांढरीशुभ्र इडली आणि कुरकुरीत डोसे तयार करु शकतो.
फक्त ७ सोप्या स्टेप्समध्ये इडली-डोसा बॅटर कसे तयार करावे, जेणेकरून इडल्या कापसासारख्या मऊ होतील आणि डोसे सोनेरी, कुरकुरीत, याचा सिक्रेट फॉर्म्युला पाहूयात...
१. स्टेप १ :- डाळ आणि तांदूळ भिजत घालणे :-
इडली-डोसा बॅटरसाठी योग्य प्रमाणात उडीद डाळ आणि इडली राईस घेणे महत्त्वाचे आहे. सगळे जिन्नस किमान ३ ते ४ वेळा पाण्याने धुवून स्वच्छ करा. साधारणपणे, ३:१ हे प्रमाण (उदा. ३ कप तांदूळ, १ कप उडीद डाळ) वापरा. मेथी दाणे टाकल्यास पचन सुधारायला मदत होते. त्यांना किमान ४ ते ६ तास किंवा रात्रभर वेगवेगळ्या भांड्यात भिजत घाला.
२. स्टेप २ :- डाळ आणि तांदूळ वाटणे :-
प्रथम भिजवलेली डाळ कमी पाण्यात, एकदम बारीक आणि गुळगुळीत टेक्शचर येईपर्यंत वाटा. त्यानंतर, भिजवलेले तांदूळ थोडे जाडसर वाटा. दोन्ही वाटताना पाण्याचा वापर जपून करा. जास्त पाणी टाकू नका.
३. स्टेप ३ :- मिश्रण एकत्र करणे :-
आता वाटलेली डाळ आणि तांदूळ एका मोठ्या भांड्यात एकत्रित करा. मिश्रण हाताने चांगले मिक्स करा. हाताच्या उष्णतेमुळे फर्मेंटेशन होण्याच्या प्रक्रियेला मदत मिळते.
४. स्टेप ४ :- मीठ घालणे :-
मिश्रण एकत्र झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ घाला. मीठ फर्मेंटेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिश्रण चांगले ढवळून घ्या.
५. स्टेप ५ :- पीठ आंबवण्याची प्रक्रिया :-
हे मिश्रण आता आंबवण्यासाठी तयार आहे. भांडे एका झाकणाने व्यवस्थित झाका आणि उबदार जागी किमान ८ ते १२ तास किंवा रात्रभर ठेवा. थंडीच्या दिवसात पीठ आंबण्यासठी जास्त वेळ लागू शकतो.
६. स्टेप ६ :- फर्मेंट झालेले बॅटर तपासणे :-
७ ते ८ तासांनंतर, पाहिल्यावर बॅटर व्यवथित फुललेले दिसेल. त्यात छोटे छोटे बुडबुडे आलेले असतील. बॅटरमध्ये जर छोटे बुडबुडे आले असतील तर बॅटर आंबवण्याची प्रक्रिया अगदी व्यवस्थित झाले आहे असे समजावे. हलक्या हाताने एकदा बॅटर व्यवस्थित मिक्स करुन घ्या.
७. स्टेप ७ :- गरमागरम इडली-डोसा तयार करणे :-
आता परफेक्ट इडली-डोसा बॅटर तयार आहे! या बॅटरपासून आपण मऊ, जाळीदार इडल्या तयार करु शकता किंवा तव्यावर सोनेरी, कुरकुरीत डोसे करुन सांबार आणि चटणीसोबत खाण्याचा आनंद घेऊ शकता.