घरी रवाळ सुगंधी साजूक तूप करण्यासाठी ८ टिप्स, कमी साय विरजूनही होईल भरपूर तूप
Updated:January 6, 2026 17:39 IST2026-01-06T09:38:03+5:302026-01-06T17:39:00+5:30
How To Make Ghee At Home : तूप कढवण्यासाठी नेहमी जाड बुडाची कढई वापरावी. जेणेकरून तूप जळणार नाही आणि त्याचा रंग छान येईल.

कमी सायीत जास्त तूप काढण्यासाठी तसंच ते ताजं राहण्यासाठी साय नेहमी फ्रिजरमध्ये साठवावी. यामुळे ती खराब होत नाही आणि त्याला आंबट वास येत नाही. (How To Make Ghee At Home)
साय कढवण्यासाठी त्यात थोडं दही घालून रात्रभर बाहेर ठेवावे. विरजण लावलेल्या सायीचे तूप चवीला उत्तम लागते आणि जास्त प्रमाणात निघते.
मिक्सरमध्ये साय फिरवताना त्यात एकदम थंड पाणी किंवा बर्फाचे खडे घालावेत यामुळे लोणी लवकर सुट्टी होते आणि वर तरंगते.
लोणी काढल्यानंतर २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या यामुळे लोण्यातील ताकाचा अंश निघून जातो आणि तूप कडवताना बेरी कमी निघते.
तूप कढवण्यासाठी नेहमी जाड बुडाची कढई वापरावी. जेणेकरून तूप जळणार नाही आणि त्याचा रंग छान येईल.
तूप नेहमी मंद आचेवर कढवावे. मोठ्या आचेवर तूप जळण्याची शक्यता असते आणि त्याचे प्रमाणही कमी भरते.
तूप कढवताना त्यात तुळशीची पानं किंवा विड्याचे पान घातल्यास तुपाला छान सुगंध येतो आणि ते जास्त काळ टिकते.जेव्हा तुपाचा तवंग स्पष्ट दिसेल आणि बेरी फिकट गुलाबी रंगाची होईल तेव्हा गॅस बंद करावा.
तूप कोमट असतानाच स्टिलच्या गाळणीनं गाळून घ्यावं. जेणेकरून बेरीतील उरलेलं तूपही व्यवस्थित निघेल.