मऊसूत ४ पदरांची घडीची पोळी करण्यासाठी ८ टिप्स, टम्म फुगेल-शिळीही राहील मऊ
Updated:February 9, 2026 17:22 IST2026-02-08T19:21:43+5:302026-02-09T17:22:48+5:30
How To Make Multi layered Chapati : कणीक मळल्यानंतर त्यावर थोडं तेल लावून किमान १५ ते २० मिनिटं झाकून ठेवा. यामुळे पिठातील ग्लुटेन सक्रिय होते आणि पोळी लाटताना फाटत नाही.

घडीची पोळी मऊ आणि चेंडूसारखी टम्म फुगण्यासाठी काही खास टिप्स तुम्हाला उपयोगी येतील. पोळीचे पीठ मळताना त्यात थोडं तेल आणि चवीपुरता मीठ घाला. पीठ खूपच घट्ट किंवा खूपच सैल असू नये. पीठ जितकं मऊ मळाल तितकीच पोळी छान फुगते. (How To Make Multi layered Chapati)
कणीक मळल्यानंतर त्यावर थोडं तेल लावून किमान १५ ते २० मिनिटं झाकून ठेवा. यामुळे पिठातील ग्लुटेन सक्रिय होते आणि पोळी लाटताना फाटत नाही. (Multi Layered Chapati Making 8 Tips)
पीठ मळताना कोमट पाण्याचा वापर केल्यास पोळ्या जास्त मऊ राहतात आणि कडा कडक होत नाहीत. पोळीचा गोळा लाटून त्यावर थोडं तेल लावा आणि त्यावर किंचिंत कोरडं पीठ घाला. यामुळे पोळीचे पापुद्रे एकमेकांना चिकटत नाहीत आणि पोळी छान फुगते.
घडी घालताना ती व्यवस्थित दाबा पण मधल्या भागावर जास्त जोर देऊ नका. घडी घातल्यानंतर कडा व्यवस्थित बंद करा जेणेकरून हवा आत राहील.
पोळी लाटताना ती कडांकडून लाटावी. मधल्या भागावर जास्त दाब देऊ नका. अन्यथा पापुद्रे चिकटून पोळी फुगणार नाही. पोळी टाकण्यापूर्वी तवा व्यवस्थित गरम असावा. थंड तव्यावर पोळी घातल्यास ती चिकट होते आणि नीट फुगत नाही.
पोळी तव्यावर घातल्यानंतर पहिली बाजू फक्त ५ ते १० सेकंदंच भाजून लगेच उलटा. दुसरी बाजू मात्र व्यवस्थित भाजू द्या.
पोळी दोन्ही बाजूनं शेकली की कडेने तेल किंवा तूप सोडा. यामुळे वाफ आत कोंडलली जाते आणि पोळी टम्म फुगते.
पोळी तव्यावरून काढल्यानंतर ती थेट ताटात न ठेवता जाळीवर किंवा सुती कापडावर ठेवा. यामुळे वाफेमुळे पोळी खालून ओली होत नाही.