थंडीतही डोशाचं पीठ मस्त फुलून येण्यासाठी पाहा ७ ट्रिक्स, इडली-डोसा-उत्तपे करा मस्त-खा पोटभर
Updated:December 3, 2025 17:09 IST2025-12-03T16:28:01+5:302025-12-03T17:09:50+5:30
How To Make Dosa Crispy : हिवाळ्यात पीठ फुगण्यासाठी उष्ण आणि सुरक्षित जागा निवडा.

हिवाळ्यामध्ये डोश्याचे पीठ (Dosa Batter) न फुलण्याची समस्या अनेकजणांना येते आणि त्यामुळे डोसा कुरकुरीत होण्यासाठी पीठ दळताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. (How To Make Dosa Crispy)
तांदूळ आणि उडीद डाळीचे प्रमाण योग्य ठेवा. ३ वाटी तांदूळ आणि १ वाटी उडीद डाळ घ्या. काहीजण कुरकुरीतपणा वाढवण्यासाठी थोडे जास्त तांदूळ घेतात. (Easy Ways To Make Dosa Crispy)
१ वाटी उडीद डाळीसाठी दीड चमचा मेथी दाणे वापरा. यामुळे फर्मेंटेशन प्रक्रिया वेगानं होण्यास मदत होते.
हिवाळ्यात पीठ फुगण्यासाठी उष्ण आणि सुरक्षित जागा निवडा. काहीजण गरम पाण्याची बाटली किंवा थर्मल पॅड शेजारी पीठ ठेवतात.
थंडीमध्ये पीठ फुगवण्यासाठी १८ ते २४ तास लागू शकतात गरम ठिकाणी ठेवल्यास थोडा कमी वेळ लागू शकतो.
पीठ वाटताना दीड वाटी शिजवलेला भात किंवा पोहे वापरल्यास डोसा अधिक कुरकुरीत होते आणि त्याला रंगही छान येतो.
पीठ तयार झाल्यावर डोसा करण्यापूर्वी १ ते २ चमचे बारीक रवा किंवा मैदा मिसळल्यास डोशाला क्रिस्पीनेस येतो.
तव्याचे तापमान योग्य असावे. डोसा घालण्यापूर्वी तापमान थोडे कमी करण्यासाठी तव्यावर पाण्याचे काही थेंब शिंपडा आणि लगेच कापडानं पुसून घ्या.