1 / 8आपल्यापैकी अनेकांच्या घरात सकाळच्या नाश्त्यात ढोकळा खाल्ला जातो. परंतु, अनेकदा विकतच्या ढोकळ्यापेक्षा घरी बनवण्याची इच्छा होते. ढोकळा हा हलका, चवदार आणि पचायला चांगला असणारा पदार्थ. (soft spongy dhokla)2 / 8पण घरी बनवताना अनेकदा ढोकळा बनवताना तो व्यवस्थित फुगत नाही, कडक होतो किंवा गिळताना घशात अडकतो. काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्यास ढोकळा एकदम परफेक्ट बनेल. (dhokla recipe tricks)3 / 8सगळ्यात आधी ढोकळ्याचे पीठ योग्य प्रमाणात आंबलेले असणे महत्त्वाचे आहे. पीठ फार घट्ट असेल तर ढोकळा दाटसर आणि कोरडा होतो, ज्यामुळे तो गिळताना अडकतो. 4 / 8पीठ तयार करताना थोडंसं जास्त पाणी घालून त्याला थोडी सैलसर कन्सिस्टन्सी होईल. त्यात मीठ- सोडा घालून पुन्हा एकदा हलवून बॅटर वाफवण्यास ठेवा. यामुळे पीठात हवा मिसळली जाते आणि ढोकळा अगदी स्पाँजी आणि हलका होतो. 5 / 8वाफवताना साधरण १५ ते २० मिनिटं मध्यम आचेवर वाफवला तर ढोकळा मऊ आणि स्पाँजी होतो. वाफवल्यानंतर लगेच कापू नका, थोडं थंड होऊ द्या म्हणजे तुटणार नाही आणि व्यवस्थित होईल. 6 / 8तडका देताना तेल, मोहरी, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून त्यावर पाणी-साखरेचा सिरप घालावा. हा सिरप ढोकळ्यात छान ओलावा तयार करतो आणि त्याची चवही दुप्पट करतो. 7 / 8सिरपमुळे ढोकळा अगदी ओलसर आणि मऊ होतो, गिळताना त्रास होत नाही.8 / 8पीठाची कन्सिस्टन्सी, एनोचे योग्य प्रमाण, आणि वाफवण्याची वेळ हे तीन महत्वाचे घटक आहेत. हे लक्षात ठेवले तर ढोकळा नेहमी परफेक्ट बनेल, स्पाँजी आणि हलका होईल.