1 / 8कांद्याचा पराठा कुणाला बरं नाही आवडणार? आपल्यालापैकी अनेकांना सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात चमचमीत आणि चटपटीत पदार्थ खायला आवडतात. पण पराठा हा असा पदार्थ आहे जो कोणत्याही क्षणी खाता येतो. त्यातील एक कांदा पराठा. (Onion Paratha)2 / 8कांदा पराठा बनवताना अनेकदा तो फसतो किंवा कांदा कुरकुरीत होत नाही. पीठ जास्त प्रमाणात चिकट होते किंवा घट्ट होते. यामुळे आपण सरळ बाहेर खाण्याचा पर्याय निवडतो. पण या ६ टिप्स फॉलो केल्या तर पराठा मस्त फुगेल आणि कुरकुरीत होईल. (Crispy Paratha Recipe)3 / 8कांद्याच्या पराठा करताना पीठ नेहमी मऊ असायला हवं. यासाठी आपल्याला पीठ मळताना त्यात चिमूटभर मीठ आणि चमचाभर तेल घालायला हवे. यामुळे पराठा कुरकुरीत होतो. पीठ मळल्यानंतर ते २० मिनिटे झाकून ठेवा. 4 / 8बऱ्याचदा कांद्याला पाणी सुटते. त्यामुळे पराठे चविष्ट लागत नाहीत. यासाठी कांदा बारीक चिरून घ्या आणि त्यात एक चमचा मीठ घाला. यानंतर काही वेळाने कांद्याला पाणी सुटेल. याचे पाणी हाताने पिळून काढून घ्या. 5 / 8ढाबा स्टाईल पराठा करण्यासाठी आपल्याला जिरे, धणे आणि खडा मसाला तव्यावर व्यवस्थित भाजून घ्यायला हवे. नंतर याची पावडर करुन कांद्यामध्ये घाला. ज्यामुळे पराठा अधिक टेस्टी होईल. 6 / 8स्टफिंग करण्यासाठी आपल्याला एका भांड्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या धणे, तयार केलला मसाला, कसुरी मेथी, गरम मसाला आणि मीठ घाला. कांद्याचे पाणी काढून त्यात कांदा देखील घाला. 7 / 8आता कणकेचा गोळा हलका लाटून घ्या. त्यावर तयार सारण भरुन गोळा हाताने बंद करा. व्यवस्थित लाटून घ्या. पराठा फाटणार नाही याची काळजी देखील घ्या. 8 / 8पराठे नेहमी मंद आचेवर शिजवावेत. यामुळे ते कुरकुरीत होतात. सगळ्यात आधी पराठ्यांच्या दोन्ही बाजू चांगल्या प्रकारे शिजवा, नंतर त्यावर तेल किंवा तूप लावा. तयार होईल चटपटीत- कुरकुरीत ढाबा स्टाईल कांदा पराठा.