1 / 7पावसाळ्यात आपल्याला अनेक चटकदार पदार्थ खाण्याची वारंवार इच्छा होते. वडापाव, भजी, पापडसारखे तळलेले पदार्थ खाऊन कंटाळा येतो. नवीन काही तरी ट्राय करावं असं आपल्याला वाटतं.(potato fries crispy hack) 2 / 7बटाटा हा आपल्याला सर्वांचा आवडता. बटाट्याची भजी, कापं, वडे असे सर्व पदार्थ चवीने खातो. या सर्वांव्यतिरिक्त फ्रेंच फ्राईज हा सर्वांच्या आवडीचा स्नॅक्स. (best way to fry french fries)3 / 7घरी फ्रेंच फ्राईज करताना अनेकदा ते मऊ होतात, नरम पडतात आणि कुरकुरीत होत नाही. अशावेळी ही सोपी ट्रिक वापरल्यास विकतसारखी टेस्ट लागेल. (kitchen tips for crunchy snacks)4 / 7फ्राईज करण्यासाठी स्टार्चयुक्त बटाट्यांचा वापर करा. यासाठी आपण मोठे पांढरे बटाटे निवडायला हवे. हे लवकर शिजतात आणि तळल्यानंतर कुरकुरीत होतात. 5 / 7बटाटे कापल्यानंतर तेलात टाकू नका. त्यांना ३० मिनिटे थंड पाण्यात भिजवा. ज्यामुळे त्यातील अतिरिक्त स्टार्च निघून जाईल. या पाण्यात थोडा व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घातला तर उत्तम. 6 / 7बटाटे पाण्यातून काढल्यानंतर ते थोडा वेळ सुकवून घ्या. ज्यामुळे तेलात गेल्यानंतर मऊ पडणार नाही. बटाटे कोरडे करण्यासाठी त्याला स्वच्छ कापडाने पुसा. 7 / 7फ्राईज कुरकुरीत करण्यासाठी तांदळाचे पीठ वापरा. तांदळाच्या पीठामध्ये कमी ओलावा असतो. ज्यामुळे फ्राईज कुरकुरीत तळले जातात.