टपरीवर मिळतो तसा कुरकुरीत ब्रेड पकोडा घरी करण्यासाठी ८ टिप्स-पकोडे कमी तेलकट पण खुसखुशीत

Updated:January 27, 2026 14:27 IST2026-01-27T13:53:18+5:302026-01-27T14:27:54+5:30

How To Make Crispy Bread Pakoda at Home : बेसनचे बॅटर तयार झाल्यावर त्यात १ चमचा कडकडीत गरम तेल घाला.

टपरीवर मिळतो तसा कुरकुरीत ब्रेड पकोडा घरी करण्यासाठी ८ टिप्स-पकोडे कमी तेलकट पण खुसखुशीत

हॉटेलमध्ये मिळतो तसा बाहेरून कुरकुरीत आणि आतून चटपटीत असा ब्रेड पकोडा घरी करणं फारचं कठीण नाही. फक्त काही खास युक्त्या वापरल्या की त्याची चव अगदी बाहेरसारखी लागते. (How To Make Crispy Bread Pakoda at Home)

टपरीवर मिळतो तसा कुरकुरीत ब्रेड पकोडा घरी करण्यासाठी ८ टिप्स-पकोडे कमी तेलकट पण खुसखुशीत

बेसनाचे पीठ जास्त घट्ट नसावे आणि जास्त पातळही नसावे. पीठ ब्रेडला व्यवस्थित चिकटेल इतपत मध्यम हवं. पिठात थोडं तांदळाचं पीठ मिसळल्यास पकोडा जास्त वेळ कुरकुरीत राहतो. (Bread Pakoda Making Tips)

टपरीवर मिळतो तसा कुरकुरीत ब्रेड पकोडा घरी करण्यासाठी ८ टिप्स-पकोडे कमी तेलकट पण खुसखुशीत

बेसनचे बॅटर तयार झाल्यावर त्यात १ चमचा कडकडीत गरम तेल घाला. यामुळे पकोड्याचे बाहेरचे आवरण खुसखुशीत होते आणि पकोडा जास्त तेल ओढून घेत नाही.

टपरीवर मिळतो तसा कुरकुरीत ब्रेड पकोडा घरी करण्यासाठी ८ टिप्स-पकोडे कमी तेलकट पण खुसखुशीत

पकोड्यासाठी लागणारी बटाट्याची भाजी जास्त ओलसर नसावी. भाजी करताना त्यात पाण्याचा वापर टाळा. भाजी जितकी सुकी असेल तितकाच ब्रेड मऊ पडणार नाही.

टपरीवर मिळतो तसा कुरकुरीत ब्रेड पकोडा घरी करण्यासाठी ८ टिप्स-पकोडे कमी तेलकट पण खुसखुशीत

बेसनाच्या पिठात ओवा हातावर चोळून घालावा. यामुळे पचन सुलभ होते आणि चवही वाढते. तसंच बटाट्याच्या भाजीत आलं-लसूण आणि हिरवी मिरची यांचा ठेचा वापरल्यानं हॉटेलसारखा तिखटपणा येतो.

टपरीवर मिळतो तसा कुरकुरीत ब्रेड पकोडा घरी करण्यासाठी ८ टिप्स-पकोडे कमी तेलकट पण खुसखुशीत

हॉटेलमध्ये ब्रेडच्या एका स्लाईसला हिरवी चटणी आणि दुसऱ्या स्लाईसला चिंच खजूराची चटणी लावली जाते. यामुळे पकोड्याला आंबट गोड असा जबरदस्त स्वाद येतो.

टपरीवर मिळतो तसा कुरकुरीत ब्रेड पकोडा घरी करण्यासाठी ८ टिप्स-पकोडे कमी तेलकट पण खुसखुशीत

बॅटरमध्ये अगदी चिमूटभर सोडा वापरा, जास्त सोडा झाल्यास पकोडा तेल खेचून घेतो. आणि पकोडे तळण्याच्या अगदी आधी सोडा घालून पीठ नीट फेटून घ्या.

टपरीवर मिळतो तसा कुरकुरीत ब्रेड पकोडा घरी करण्यासाठी ८ टिप्स-पकोडे कमी तेलकट पण खुसखुशीत

पकोड्यासाठी फ्रेश ब्रेडऐवजी एक दिवस जुना ब्रेड वापरल्यास तो तेल कमी शोषून घेतो. तसंच पकोडा मधून तिरपा कापताना धारदार चाकू वापरा म्हणजे आकार बिघडणार नाही.