भाकरी जमतच नाही, कधी तुटते-शेकल्यावर कडक होते? ८ टिप्स, परफेक्ट बाजरीची भाकरी करा
Updated:November 3, 2025 16:22 IST2025-11-03T16:04:49+5:302025-11-03T16:22:55+5:30
How To Make Bhajra Roti At Home : भाकरी थापताना खाली कोरड्या बाजरीच्या पिठाचा वापर करा. ज्यामुळे ती थापताना चिकटणार नाही.

भाकरी करण्यासाठी नेहमी ताजं, दळलेले आणि शक्य असल्यास जास्त बारीक नसलेलं बाजरीचं पीठ वापरा, जुनं पीठ असेल तर भाकरी कडक होते.पीठ मळण्यासाठी कोमट किंवा किंचिंत गरम पाण्याचा वापर करा. गरम पाण्यामुळे भाकरीला मऊपणा येतो. (How To Make Bhajra Roti At Home)
भाकरीचे पीठ एकाचवेळी मळून ठेवू नका. एका भाकरीसाठी लागणारे पीठ घेऊन जोर लावून ते तितकंच मळा. जेवढं जास्त मळा तेव्हढं भाकरी मऊ होते आणि कडांना तडे जात नाहीत. (Bhajrichi Bhakari Recipe)
पीठ सैल होणार नाही याची काळजी घ्या. ते चपातीच्या पिठापेक्षा थोडं मऊ असायला हवं.
भाकरी थापताना खाली कोरड्या बाजरीच्या पिठाचा वापर करा. ज्यामुळे ती थापताना चिकटणार नाही.
भाकरी हलक्या हातानं आणि एकसारखी जाडी ठेवून थापा. जास्त दाब दिल्यास भाकरी थापतानाच तुटते.
भाकरीच्या कडांना तडे पडू नयेत यासाठी कडा जास्त जाड न ठेवता त्या बोटांनी व्यवस्थित दाबून घ्या.
भाकरी भाजण्यासाठी तवा मध्यम ते चांगला गरम करा.गरम तव्यावर भाकरी टाकल्यास लगेच वरच्या बाजूला थोडं पाणी लावून हातानं पसरवा, पाणी सुकलं की भाकरी पलटून घ्या.
भाकरी दोनवेळा पलटून घ्या. दुसऱ्या बाजूनं व्यवस्थित भाजल्यावर ती थेट गॅसच्या आचेवर किंवा जाळीवर ठेवा.मंच आचेवर भाकरी हळूवारपणे गरम कापडानं दाबून फुगवा. भाकरी फुगली की ती मऊ होते.