फ्रिजमध्ये ठेवूनही भाज्या सडतात? 'या' टिप्स पाहा- १५ दिवस भाज्या राहतील एकदम फ्रेश

Updated:September 19, 2025 15:42 IST2025-09-19T15:33:16+5:302025-09-19T15:42:50+5:30

फ्रिजमध्ये ठेवूनही भाज्या सडतात? 'या' टिप्स पाहा- १५ दिवस भाज्या राहतील एकदम फ्रेश

बऱ्याचदा असा अनुभव येतो की फ्रिजमध्ये ठेवूनही भाज्या २ ते ३ दिवसांतच खराब होतात. कारण आपण त्या चुकीच्या पद्धतीने साठवून ठेवतो. म्हणूनच कोणती भाजी कशा पद्धतीने साठवून ठेवायची याविषयी या काही खास टिप्स पाहा..

फ्रिजमध्ये ठेवूनही भाज्या सडतात? 'या' टिप्स पाहा- १५ दिवस भाज्या राहतील एकदम फ्रेश

पालक, मेथी अशा भाज्या पेपर नॅपकिनमध्ये गुंडाळा आणि मग त्या झिप लॉक बॅगमध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवा. आठवडाभर भाज्या अगदी फ्रेश राहतील.

फ्रिजमध्ये ठेवूनही भाज्या सडतात? 'या' टिप्स पाहा- १५ दिवस भाज्या राहतील एकदम फ्रेश

टोमॅटोच्या देठाला थोडेसे तेल लावून ठेवा. टोमॅटो ७ ते ८ दिवस अगदी छान टिकतात.

फ्रिजमध्ये ठेवूनही भाज्या सडतात? 'या' टिप्स पाहा- १५ दिवस भाज्या राहतील एकदम फ्रेश

फ्रिजमध्ये ठेवलेलं आलंही काही दिवसानंतर सुकून जातं. असं होऊ नये म्हणून आलं एका एअरटाईट डब्यात ठेवा आणि त्या डब्यामध्ये एका पेपर नॅपकिनमध्ये थोडं मीठ गुंडाळून ठेवा. आलं फ्रेश राहील.

फ्रिजमध्ये ठेवूनही भाज्या सडतात? 'या' टिप्स पाहा- १५ दिवस भाज्या राहतील एकदम फ्रेश

कोथिंबीर जास्तीत जास्त दिवस फ्रेश ठेवण्यासाठी तिच्या देठाकडचा थोडासा भाग कापून घ्या आणि ती एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घालून त्यामध्ये ठेवून द्या. कोथिंबीरीवरून एक प्लास्टिकची पिशवी किंवा काचेचे भांडे लावा.

फ्रिजमध्ये ठेवूनही भाज्या सडतात? 'या' टिप्स पाहा- १५ दिवस भाज्या राहतील एकदम फ्रेश

लिंबू एक ते दोन महिने अगदी फ्रेश ठेवण्यासाठी एक काचेची बरणी घ्या. त्यात लिंबू टाकून पाणी भरा आणि झाकण लावून ही बरणी फ्रिजमध्ये ठेवून द्या.

फ्रिजमध्ये ठेवूनही भाज्या सडतात? 'या' टिप्स पाहा- १५ दिवस भाज्या राहतील एकदम फ्रेश

बटाट्यांना कोंब येऊ नयेत म्हणून बटाट्यांमध्ये एखादे सफरचंद टाकून ठेवा. बटाटे जास्तीत जास्त दिवस फ्रेश राहतील.

फ्रिजमध्ये ठेवूनही भाज्या सडतात? 'या' टिप्स पाहा- १५ दिवस भाज्या राहतील एकदम फ्रेश

हिरव्या मिरच्यांची देठं काढून घ्या. त्यानंतर मिरच्या पेपर नॅपकिनमध्ये गुंडाळा आणि काचेच्या एअरटाईट डबीमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवा. मिरच्या महिनाभर फ्रेश राहतील.