गरम चपाती डब्यांत ठेवताच ओली होते ? ५ ट्रिक्स - चपाती ओली न होता राहील मऊ लुसलुशीत...

Updated:September 18, 2025 20:14 IST2025-09-18T20:04:28+5:302025-09-18T20:14:13+5:30

how to keep roti soft and hot for long time : how to store roti for long hours : keep chapati soft in casserole : tips to keep roti fresh in tiffin : गरम चपात्या थेट डब्यात किंवा कॅसरोलमध्ये ठेवल्यास होतात ओल्या, ५ ट्रिक्स आहेत उपयोगी...

गरम चपाती डब्यांत ठेवताच ओली होते ? ५ ट्रिक्स - चपाती ओली न होता राहील मऊ लुसलुशीत...

बरेचदा गरमागरम तयार केलेल्या चपात्या डब्यांत ठेवल्या की, काहीवेळाने त्या (how to keep roti soft and hot for long time) ओलसर, चिकट व चिवट होतात. खरंतर, जेव्हा गरम चपात्या थेट डब्यात किंवा कॅसरोलमध्ये बंद करून ठेवल्या जातात, तेव्हा त्यांची उष्णता आतमध्ये वाफ बनून साचते. हीच वाफ पाण्याच्या थेंबांमध्ये बदलते, ज्यामुळे चपात्या ओल्या होतात. ओलसर आणि चिकट चपात्या केवळ बेचवच लागत नाहीत, तर त्या आरोग्यासाठीही हानिकारक असू शकतात.

गरम चपाती डब्यांत ठेवताच ओली होते ? ५ ट्रिक्स - चपाती ओली न होता राहील मऊ लुसलुशीत...

आपण अनेकदा डब्यात गरमागरम चपात्या ठेवतो आणि काही वेळातच त्या ओलसर, चिवट होतात. त्यामुळे चपातीची चव आणि मऊपणा कमी होतो. रोजच्या डब्यासाठी चपात्या नेताना आपल्याला हीच समस्या असते. पण काही सोप्या आणि खास टिप्स वापरल्या, तर चपात्या ताज्या, मऊ राहतील आणि ओल्या देखील होणार नाहीत.

गरम चपाती डब्यांत ठेवताच ओली होते ? ५ ट्रिक्स - चपाती ओली न होता राहील मऊ लुसलुशीत...

चपात्या ठेवण्याच्या डब्याच्या किंवा कॅसरोलच्या तळाशी सर्वात आधी एक फॉइल पेपर पसरा. त्यानंतर, फॉइल पेपरच्या वर एक किंवा दोन पेपर टॉवेल ठेवा.आता यावर आपल्या चपात्या ठेवा. जर तुम्ही अनेक चपात्या एकावर एक ठेवत असाल, तर प्रत्येक दोन किंवा तीन चपात्यांनंतर एक छोटा पेपर टॉवेल ठेवा. सर्वात वरच्या चपातीवर देखील एक पेपर टॉवेल ठेवा आणि त्यानंतर डब्याचे झाकण लावा म्हणजे चपात्या ओल्या होऊन भिजणार नाहीत.

गरम चपाती डब्यांत ठेवताच ओली होते ? ५ ट्रिक्स - चपाती ओली न होता राहील मऊ लुसलुशीत...

अनेकदा लोक घाईघाईत गरम चपात्या थेट डब्यात ठेवून झाकण लावतात. हीच सर्वात मोठी चूक आहे. जेव्हा तुम्ही चपात्या बनवता, तेव्हा त्या लगेच डब्यात ठेवू नका. त्यांना थोडा वेळ जाळीच्या टोपलीत किंवा प्लेटमध्ये ठेवून थंड होऊ द्या. जेव्हा चपात्या थोड्या थंड होतात, तेव्हा त्यातून वाफ बाहेर पडणे थांबते. त्यानंतर, त्या डब्यात ठेवल्यास आतमध्ये वाफ तयार होत नाही आणि चपात्या ओल्या होत नाहीत.

गरम चपाती डब्यांत ठेवताच ओली होते ? ५ ट्रिक्स - चपाती ओली न होता राहील मऊ लुसलुशीत...

चपात्या ठेवण्यापूर्वी डब्याच्या तळाशी एक स्वच्छ टिशू पेपर ठेवा. हा पेपर चपात्यांमधील अतिरिक्त ओलावा शोषून घेतो. तुम्ही प्रत्येक चपातीमध्येही टिशू पेपर ठेवू शकता.

गरम चपाती डब्यांत ठेवताच ओली होते ? ५ ट्रिक्स - चपाती ओली न होता राहील मऊ लुसलुशीत...

अनेक लंच बॉक्समध्ये झाकणाला लहान छिद्र असते. अशा डब्यांचा वापर केल्यास वाफ बाहेर पडते आणि चपात्या ओल्या होत नाहीत.

गरम चपाती डब्यांत ठेवताच ओली होते ? ५ ट्रिक्स - चपाती ओली न होता राहील मऊ लुसलुशीत...

अनेकदा लोक एकाच डब्यात खूप साऱ्या चपात्या भरतात. त्यामुळे चपात्यांना हवा लागत नाही आणि ओलावा आतच अडकून राहतो. शक्य असल्यास, एका डब्यात गरजेनुसारच चपात्या ठेवा. तुम्ही जो डबा किंवा कॅसरोल वापरत आहात, तो पूर्णपणे कोरडा असावा आणि त्यात आधीपासून ओलावा नसावा.