Join us

फणस कापा की बरका? ओळखण्यासाठी फक्त ६ टिप्स, अंदाज चुकणार नाही! गरे खा पोटभर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2025 11:19 IST

1 / 9
'फणस' हे वर्षभरातून एकदाच येणारे फळं. वर्षभरातून एकदाच खायला मिळणाऱ्या या फणसाची आपण फार आतुरतेने वाट पाहात असतो. फणसाचे गोड, मधुर, रसाळ गरे खाण्यासारखे (How to identify 'kapa' jackfruit and 'barka' jackfruit) दुसरे सुख नाही.
2 / 9
फणसाचे प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात, एक कापा आणि एक बरका. पण बाजारात ( This is the difference between barka and Kapa jackfruit) गेल्यावर कापा आणि बरका फणस ओळखण्यात अनेकदा सगळ्यांचाच गोंधळ उडतो. दोन्ही फणसांचे स्वतःचे असे वैशिष्ट्य आहे आणि त्यांची चव व उपयोगही वेगवेगळे आहेत.
3 / 9
बाजारांतून फणस विकत घेताना कापा आणि बरका फणस यात ( 'kapa' jackfruit and 'barka' jackfruit Just 6 tips to identify it) गल्लत होऊ नये. यासाठी कापा आणि बरका फणस फणस यातील फरक कसा ओळखायचा याच्या खास टिप्स पाहूयात.
4 / 9
फणसाला बाहेरच्या बाजूने काट्यांचे आवरण असते. कापा फणसावरील काटे हे थोडे बसके आणि पसरट असतात. याउलट बारक्या फणसावरील काटे हे थोडे टोकदार आणि उभे असतात, फणस हातात घेतल्यावर ते हातानं अक्षरशः टोचतात.
5 / 9
कापा फणसाचे गरे हे घट्ट व खोबऱ्यासारखे थोडे कडक असतात. बरक्या फणसाचे गरे मऊ, लुसलुशीत आणि थोडे गिळगिळीत असतात.
6 / 9
कापा फणसांचे गरे हे सहजपणे सालीपासून अगदी पटकन वेगळे करता येतात. बरका फणसाचे गरे चिकट आणि मऊ असल्याने हे सालीपासून वेगळे करण्यासाठी मेहेनत घ्यावी लागते.
7 / 9
कापा फणस भाजीसाठी किंवा सुके फणसाचे चिप्स बनवण्यासाठी जास्त वापरला जातो. याच्या गऱ्यांना एक विशिष्ट प्रकारचा कुरकुरीतपणा असतो. बरका फणस सहसा पिकल्यावरच खाल्ला जातो. याचा वापर अनेकदा जॅम, मिल्कशेक किंवा इतर गोड पदार्थांमध्ये केला जातो.
8 / 9
कापा फणसाचा जास्त वास येत नाही, किंवा खूप सौम्य वास येतो. याउलट, बरका फणस पिकल्यावर खूप गोड आणि तीव्र सुगंध देतो. हा वास लांबूनही ओळखता येतो.
9 / 9
कापा फणस दाबून पाहिल्यास घट्ट आणि टणक लागतो, तो लवकर नरम पडत नाही. बरका फणस दाबून पाहिल्यास मऊ आणि लवचिक लागतो. तो लवकर नरम पडतो.
टॅग्स : अन्नफळेसमर स्पेशल