थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच

Updated:April 6, 2026 18:39 IST2026-04-06T18:13:10+5:302026-04-06T18:39:48+5:30

आजकाल बाजारात मिळणारे सर्वच आंबे नैसर्गिकरित्या पिकलेले असतीलच असं नाही.

थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच

उन्हाळा सुरू झाला की बाजारात आंब्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या फळाची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, आजकाल बाजारात मिळणारे सर्वच आंबे नैसर्गिकरित्या पिकलेले असतीलच असं नाही.

थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच

आंबे लवकर पिकवण्यासाठी अनेकदा घातक केमिकल्सचा वापर केला जातो, जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतात. कोणत्याही फळावर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा त्याची नीट पारख करणं गरजेचं आहे.

थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच

केमिकलमुळे फळाची गुणवत्ता तर खराब होतेच, पण त्याचा शरीरावरही वाईट परिणाम होतो. केमिकलने पिकवलेले आंबे खाल्ल्याने डोकेदुखी, चक्कर येणं, उलट्या आणि पोटदुखी यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच

सुगंध - नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याला एक विशिष्ट गोड सुगंध येतो. जर आंब्याला अजिबात वास नसेल किंवा केमिकलचा खूप वास येत असेल, तर समजून जा की तो कृत्रिमरीत्या पिकवलेला आहे.

थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच

आंब्याचा रंग पाहूनही तुम्ही ओळख पटवू शकता. नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा दिसायला पिवळसर आणि नैसर्गिक रंगाचा असतो. याउलट केमिकलने पिकवलेले आंबे अतिशय चमकदार आणि सगळीकडून एकसारखे पिवळेधमक दिसतात.

थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच

आंब्यावरील डाग नीट तपासा. जर आंब्यावर जास्त काळे डाग, पांढऱ्या रंगाचे चट्टे किंवा सुई टोचल्यासारख्या खुणा दिसत असतील, तर तो आंबा केमिकल किंवा इंजेक्शन वापरून पिकवलेला असू शकतो.

थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच

आंबा हलक्या हाताने दाबून पाहा. केमिकलने पिकवलेला आंबा काही ठिकाणी खूप मऊ तर काही ठिकाणी कडक लागतो. नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा सर्व बाजूंनी सारखाच असतो.

थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच

आंब्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडा बेकिंग सोडा टाका आणि त्यात आंबे धुवा. जर धुताना आंब्याचा रंग विचित्रपणे बदलू लागला, तर समजावं की तो आंबा केमिकलचा वापर करून पिकवला आहे.