दुधाला जाड घट्ट साय येण्यासाठी ८ टिप्स- पाहा दुधाचं भांडं कसं निवडायचं-दूध कसं तापवायचं..
Updated:March 9, 2026 13:36 IST2026-03-09T12:47:16+5:302026-03-09T13:36:04+5:30
How To Get Thick Malai On Milk : दूध उकळत असताना त्यावर जी सायीची लेअर जमा होते तिचा चमच्यानं अजिबात हलवू नका. ती लेअर जेवढी स्थिर राहील तितकीच साय जाड होते.

दुधावर जाड, पराठ्यासारखी किंवा मलाईदार साय येणे ही कला आहे. त्यासाठी दुधाचा दर्जा आणि ते तापवण्याची पद्धत या दोन्ही महत्वाचे असते. साय येण्यासाठी दुधात फॅट्स असणं अत्यंत आवश्यक आहे. शक्यतो म्हशीचे ताजे दूध वापरावे. पॅकेटचे दूध वापरणार असाल तर फुल क्रिम किंवा गोल्ड दूध निवडा. (How To Get Thick Malai On Milk)
दूध तापवण्यासाठी रूंद आणि पसरट पातेलं वापरा. पातेलं जितकं पसरट असेल तितकी सायीला पसरण्यासाठी जास्त जागा मिळेल आणि साय जाड येईल. (How To Make More Malai From Milk 8 Tips)
पातेल्यात दूध ओतण्यापूर्वी 1 ते 2 चमचे पाणी घाला आणि पातेलं ओलं करून घ्या. यामुळे दूध तळाला करपत नाही आणि सायीचा पोत चांगला राहतो.
दूध कधीही मोठ्या आचेवर उकळवू नका. सुरूवातीला मध्यम आचेवर ठेवा आणि एकदा उकळी आली की गॅस अगदी मंद करा. किमान 10 ते 15 मिनिटं दूध मंद आचेवर आटू द्या.
दूध उकळत असताना त्यावर जी सायीची लेअर जमा होते तिचा चमच्यानं अजिबात हलवू नका. ती लेअर जेवढी स्थिर राहील तितकीच जाड होते.
दूध उकळवून झाल्यानंतर गॅस बंद करा. आता त्यावर फुंकर मारून किंवा हलक्या हातानं वरून हवा देऊन सायीचा थर सेट होऊ द्या. यामुळे सायीमधील आद्रता कमी होऊन ती घट्ट होते.
दूध गरम असताना त्यावर कधीही पूर्ण ताट किंवा झाकण ठेवू नका. वाफेमुळे पाणी सुटतं आणि साय पातळ होते. त्याऐवजी जाळीदार झाकण वापरा. जेणेकरून वाफ बाहेर पडेल.
दूध पूर्णपणे थंड झाल्यावर पातेलं 4 ते 5 किंवा रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा. थंड तापमानामुळे सायीमधील फॅट्स एकत्र होतात आणि साय पराठ्यासारखी जाड आणि घट्ट होते.