Join us   

गुळाची भेली फोडणं कठीण जातं- सगळीकडे चिकट होतं? बघा झटपट गूळ फोडण्याची सोपी युक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2024 6:13 PM

1 / 5
गुळाची पावडर बाजारात मिळत असली तरी अजूनही अनेक घरांमध्ये गुळाची भेलीच आणली जाते. कारण गुळाच्या पावडरची चव अनेकांना आवडत नाही. शिवाय गुळाच्या भेलीपेक्षा गुळाची पावडर तुलनेले अधिक महाग असते.
2 / 5
पण गुळाची भेली आपण आणतो तर खरं. पण ती फोडताना मात्र अनेकींना खूप वैताग येतो. कारण तो गूळ खूप कडक असल्याने सुरीने नीट कापताही येत नाही. शिवाय त्याच्यावर काही आपटून आपटून ती फोडायची म्हटलं तरी ती अगदी चिकटलोळ होऊन जाते.
3 / 5
हे सगळं टाळण्यासाठी गुळाची भेली अगदी सोप्या पद्धतीने एकदम झटपट कशी फोडावी, याबद्दलचा व्हिडिओ seemassmartkitchen या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
4 / 5
या व्हिडिओमध्ये असं दाखवलं आहे की एका डिशमध्ये बटरपेपर टाका आणि त्यावर गुळाची भेली ठेवा.
5 / 5
यानंतर तो गूळ ४० ते ५० सेकंदासाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवून द्या. नंतर तुम्ही जेव्हा तो गूळ बाहेर काढाल तेव्हा तो एकदम मऊ झालेला असेल. हा गूळ मऊ असताना पटापट कापून घ्या आणि डब्यात भरून ठेवा.
टॅग्स : कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स