डोळ्यातून इतकं घळाघळा पाणी वाहातं की कांदा चिरणंच नकोसं होतं? २ टिप्स- थेंबभरही पाणी येणार नाही..

Updated:February 27, 2026 15:09 IST2026-02-27T15:00:27+5:302026-02-27T15:09:14+5:30

डोळ्यातून इतकं घळाघळा पाणी वाहातं की कांदा चिरणंच नकोसं होतं? २ टिप्स- थेंबभरही पाणी येणार नाही..

कांदा चिरताना हा अनुभव प्रत्येकालाच येतो. म्हणूनच पुढे सांगितलेल्या काही टिप्स नक्कीच उपयोगी ठरतील.(How to Chop Onions Without Tears?)

डोळ्यातून इतकं घळाघळा पाणी वाहातं की कांदा चिरणंच नकोसं होतं? २ टिप्स- थेंबभरही पाणी येणार नाही..

कांदा एखाद्या पदार्थामध्ये घातला किंवा तोंडी लावायला घेतला तर त्या पदार्थाची, जेवणाची चव आणखी खुलते हे अगदी नक्की... पण कांदा चिरणं तेवढं सोपं मात्र मुळीच नाही.(Home Hacks To Avoid Crying While Cutting Onions)

डोळ्यातून इतकं घळाघळा पाणी वाहातं की कांदा चिरणंच नकोसं होतं? २ टिप्स- थेंबभरही पाणी येणार नाही..

एखादा तिखट कांदा असेल तर तो चिरताना डोळ्यातून एवढं घळाघळा पाणी वाहातं, की कांदा चिरणंच नकोसं होऊन जातं.

डोळ्यातून इतकं घळाघळा पाणी वाहातं की कांदा चिरणंच नकोसं होतं? २ टिप्स- थेंबभरही पाणी येणार नाही..

असं तुमच्या बाबतीतही होत असेल तर पुढे सांगितलेल्या काही टिप्स नक्कीच उपयुक्त ठरू शकतात.कांदा चिरण्यापुर्वी २ ते ३ तास आधी तो फ्रिजमध्ये ठेवून थंडगार करून घ्या. कारण थंडगार कांद्यामधून सल्फर गॅस वेगाने बाहेर पडत नाही. त्यामुळे डोळ्यातून पाणी येत नाही.

डोळ्यातून इतकं घळाघळा पाणी वाहातं की कांदा चिरणंच नकोसं होतं? २ टिप्स- थेंबभरही पाणी येणार नाही..

दुसरी एक ट्रिक म्हणजे कांद्याचं टरफल काढून टाकल्यानंतर तो लगेचच बारीक चिरायला घेऊ नका. कांद्याच्या मोठमोठ्या फोडी करा आणि त्या काही वेळ पाण्यात घालून ठेवा. त्यानंतर अर्ध्या तासाने कांदा चिरा. कांद्याचा अजिबात त्रास होणार नाही.

डोळ्यातून इतकं घळाघळा पाणी वाहातं की कांदा चिरणंच नकोसं होतं? २ टिप्स- थेंबभरही पाणी येणार नाही..

शक्य झालं तर एका पसरट भांड्यात पाणी घ्या आणि त्यामध्ये कांदा ठेवून चिरा. पाण्यात असताना कांदा चिरला तर त्यातून निघणाऱ्या सल्फरची रिॲक्शन व्हायला वेळ लागतो आणि डोळ्यातून पाणी येत नाही.