बाहेरुन चकाचक अन् आतून बेचव! संत्र, कलिंगड, द्राक्ष... रसाळ, गोड फळं कशी ओळखायची?

Updated:March 11, 2026 14:08 IST2026-03-11T13:51:10+5:302026-03-11T14:08:22+5:30

तुम्हाला कोणतं फळ चांगलं असेल आणि कोणतं खराब, हे सहज समजू शकतं. चला तर मग जाणून घेऊया वेगवेगळी फळे खरेदी करण्याची योग्य पद्धत काय आहे.

बाहेरुन चकाचक अन् आतून बेचव! संत्र, कलिंगड, द्राक्ष... रसाळ, गोड फळं कशी ओळखायची?

बाजारातून भाजीपाला आणि फळं खरेदी करणं दिसायला जरी सोपं वाटत असलं, तरी प्रत्यक्षात ही एक कौशल्यपूर्ण गोष्ट आहे. अनेकदा लोक चांगलं दिसणारं फळ पाहून ते विकत घेतात, पण घरी आल्यावर ते बेचव निघतं. खरं तर फळ पिकलेलं आहे की नाही हे ओळखणं हल्ली थोडं अवघड झालं आहे.

बाहेरुन चकाचक अन् आतून बेचव! संत्र, कलिंगड, द्राक्ष... रसाळ, गोड फळं कशी ओळखायची?

फळं खरेदी करताना त्यांचा रंग, सुगंध, वजन यांसारख्या अनेक छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. यामुळे तुम्हाला कोणतं फळ चांगलं असेल आणि कोणतं खराब, हे सहज समजू शकतं. चला तर मग जाणून घेऊया वेगवेगळी फळे खरेदी करण्याची योग्य पद्धत काय आहे.

बाहेरुन चकाचक अन् आतून बेचव! संत्र, कलिंगड, द्राक्ष... रसाळ, गोड फळं कशी ओळखायची?

जेव्हा तुम्ही सफरचंद खरेदी करता, तेव्हा त्याचा रंग पाहिला पाहिजे. समजा तुम्ही लाल सफरचंद खरेदी करत असाल, तर त्यात लाल, हलका गुलाबी आणि ऑफ-व्हाईट रंगाची छटा (शेड) दिसत असेल, तर ते नीट पिकलेलं आहे असं समजा.

बाहेरुन चकाचक अन् आतून बेचव! संत्र, कलिंगड, द्राक्ष... रसाळ, गोड फळं कशी ओळखायची?

जर सफरचंदात थोडा हिरवा रंग दिसत असेल, तर ते पूर्णपणे गोड नसू शकतं. याचा अर्थ ते खाण्यायोग्य नाही असं नाही, पण ते चवीला थोडं बेचव असू शकतं.

बाहेरुन चकाचक अन् आतून बेचव! संत्र, कलिंगड, द्राक्ष... रसाळ, गोड फळं कशी ओळखायची?

उन्हाळ्यातील फळ असलेला अननस खरेदी करताना त्याचा गोडवा ओळखण्यासाठी त्याचा वास घेऊन पाहा. जेव्हा तुम्ही अननसचा वास घेता, तेव्हा तो पिकलेला असल्यास त्यातून मस्त सुगंध येतो. जर आंबट किंवा व्हिनेगरसारखा उग्र वास येत असेल, तर तो जास्त पिकलेला आहे किंवा आतून खराब झाला आहे.

बाहेरुन चकाचक अन् आतून बेचव! संत्र, कलिंगड, द्राक्ष... रसाळ, गोड फळं कशी ओळखायची?

पिकलेला अननस ओळखण्याची दुसरी पद्धत म्हणजे, त्याच्या बाहेरील रेषांच्या मधून पाहिल्यास तो सोनेरी पिवळा दिसतो. तसेच जर तुम्ही अननसची वरची पानं काढली आणि ती सहज निघाली, तर समजावं की अननस चांगला पिकला आहे.

बाहेरुन चकाचक अन् आतून बेचव! संत्र, कलिंगड, द्राक्ष... रसाळ, गोड फळं कशी ओळखायची?

अनेकदा द्राक्ष खूप आंबट निघतात. द्राक्ष खरेदी करताना त्याच्या दाण्यासोबतच देठाकडेही लक्ष दिलं पाहिजे. ताज्या तोडलेल्या द्राक्षांचा देठ हिरवा आणि मऊ असतो, तर काही द्राक्षांचे देठ सुकलेले दिसतात.

बाहेरुन चकाचक अन् आतून बेचव! संत्र, कलिंगड, द्राक्ष... रसाळ, गोड फळं कशी ओळखायची?

जर द्राक्ष थोडं पारदर्शक दिसत असेल आणि त्यात थोडा पिवळसरपणा असेल, तर ते पिकलेलं आणि गोड असतं. द्राक्ष खरेदी करताना अनेक लोक फसतात.

बाहेरुन चकाचक अन् आतून बेचव! संत्र, कलिंगड, द्राक्ष... रसाळ, गोड फळं कशी ओळखायची?

लिंबू खरेदी करताना ते हलकं दाबून पाहावं. जर ते सहज दाबलं जात असेल, तर ते आतून रसाळ असतं. त्याचबरोबर त्याच्या सालीकडे लक्ष द्या, जर साल थोडी पारदर्शक दिसत असेल, तर तो चांगला लिंबू आहे.

बाहेरुन चकाचक अन् आतून बेचव! संत्र, कलिंगड, द्राक्ष... रसाळ, गोड फळं कशी ओळखायची?

उन्हाळ्यातील सर्वात चांगलं आणि आवडळीचं फळ म्हणजे कलिंगड. याशिवाय यात अनेक पोषक तत्वं असतात. रसाळ आणि गोड कलिंगड खरेदी करायचं असेल, तर त्याचा एक भाग हलका पिवळा किंवा क्रीमी रंगाचा आहे का ते पाहा.

बाहेरुन चकाचक अन् आतून बेचव! संत्र, कलिंगड, द्राक्ष... रसाळ, गोड फळं कशी ओळखायची?

असा डाग असेल तर समजावं की ते नीट पिकलेलं आहे, कारण जमिनीला लागून असलेल्या भागावरच असा पिवळा रंग दिसतो. कलिंगड हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.