1 / 9सणावार म्हटला की गोडधोड पदार्थांचा बेत आलाच! पण हेच गोड पदार्थ जास्त प्रमाणात (Healthy twist to traditional kheer) खाल्ले तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे सणाचा आनंद घेत, चवीसोबतच आरोग्याचाही विचार करणं गरजेचे असते. अशावेळी लाडू, बासुंदी, खीर असे अनेक गोडाधोडाचे पारंपरिक पदार्थ केले जातात, परंतु यापैकी सर्वात कॉमन आणि हमखास घरोघरी केला जाणारा पदार्थ म्हणजे खीर. सणावारानिमित्त केल्या जाणाऱ्या खिरीलाच थोडा पौष्टिक ट्विस्ट दिला, तर गोड खाण्याची इच्छा पूर्ण होते आणि शरीरालाही आवश्यक पोषकद्रव्यं मिळतात.2 / 9सणावारानिमित्त गोड पदार्थ खायच्या इच्छेला आवर घालण्याऐवजी, एक असा पर्याय (healthy kheer recipe) निवडूया जो चवीला उत्तम असेल आणि आरोग्यासाठीही फायदेशीर! 3 / 9सणावाराला हमखास केल्या जाणाऱ्या खिरीचे ६ खास पौष्टिक प्रकार... या खिरी फक्त चविष्टच नाहीत, तर त्या पोषक तत्वांनी परिपूर्ण आहेत. त्यामुळे, आपण पोटभर गोड खाऊ शकता आणि सणाचा आनंद दुप्पट करू शकता.4 / 9ओट्स खीर हा एक आरोग्यदायी आणि झटपट होणारा पदार्थ आहे. दुधात ओट्स घालून ते व्यवस्थित शिजवून घ्यावे. मग त्यात वेलची पूड, ड्रायफ्रुटस आणि साखरेऐवजी गूळ घालू शकता. ओट्स खीर हलकी असल्यामुळे पोट जास्त जड वाटत नाही आणि पौष्टिक असल्यामुळे आपण ती भरपूर प्रमाणात खाऊ शकता. ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि पचनक्रिया सुधारते.5 / 9क्विनोआ (Quinoa) हे एक सुपरफूड आहे. ही खीर फक्त पौष्टिकच नाही, तर ती पारंपरिक तांदळाच्या खिरीला एक अत्यंत आरोग्यदायी आणि पौष्टिक पर्याय ठरते. पॅनमध्ये थोडे तूप घेऊन क्विनोआ भाजून घ्या. आता त्यात दूध घालून क्विनोआ मऊ होईपर्यंत शिजवा. क्विनोआ पूर्ण शिजल्यावर, त्यात साखरेऐवजी खजूर सिरप, मेपल सिरप किंवा अगदी थोडा गूळ घाला. वेलची पावडर, केशर आणि आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकून ही पौष्टिक खीर गरम किंवा थंड सर्व्ह करा. क्विनोआमध्ये सर्व ९ आवश्यक अमिनो ॲसिड असतात, ज्यामुळे हे शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. यात मॅग्नेशियम, लोह आणि फायबर देखील भरपूर प्रमाणात असतात.6 / 9सफरचंद किसून घ्या किंवा बारीक तुकडे करा. पॅनमध्ये थोडे तूप गरम करून त्यात किसलेले सफरचंद मंद आचेवर मऊ होईपर्यंत परतून घ्या. आता उकळलेल्या दुधात बारीक केलेले बदाम किंवा काजूची पेस्ट घाला. दूध थोडे दाट झाल्यावर, त्यात परतलेले सफरचंद घाला. गोडव्यासाठी खजूर पेस्ट किंवा खूप कमी प्रमाणात गूळ वापरा आणि वेलची पूड घाला. ड्रायफ्रूट्सने सजवून गरम किंवा थंड करून खा. सफरचंदाच्या खिरीत कमी कॅलरीज आणि सफरचंदाचा नैसर्गिक गोडवा असल्याने, सणावाराला ही खीर पोटभर खाल्ली तरी आरोग्याला त्रास होत नाही.7 / 9बाजरी ६-८ तास पाण्यात भिजवून ठेवा किंवा रात्रभर भिजवा. नंतर जाडसर वाटून घ्या. दुधाला उकळी आल्यावर त्यात भिजवलेली आणि वाटलेली बाजरी घाला. बाजरी व्यवस्थित शिजून मऊ होईपर्यंत मंद आचेवर ढवळत राहा. बाजरी पूर्ण शिजल्यावर, गॅस बंद करा. गरम असताना त्यात गोडव्यासाठी बारीक केलेला गूळ घाला. वेलची पावडर आणि आवडीचे ड्रायफ्रूट्स घालून ही खीर सर्व्ह करा.बाजरीची खीर पौष्टिक, पचायला हलकी असल्याने गोडाधोडाच्या पदार्थांमध्ये एक उत्तम पदार्थ ठरते. 8 / 9मखाण्याची खीर चवीला अप्रतिम लागते आणि ती खूप हलकी व पौष्टिक असल्यामुळे आपण ती जास्त प्रमाणात खाऊ शकता. पॅनमध्ये थोडे तूप गरम करून मखाणे कुरकुरीत होईपर्यंत हलके परतून घ्या. परतलेले मखाणे बाजूला काढून त्यातील अर्धे मखाणे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. दुधाला उकळी आल्यावर त्यात वाटलेले मखाणे आणि अख्खे मखाणे घाला. मंद आचेवर खीर दाट होईपर्यंत शिजवा. गोडव्यासाठी साखरेऐवजी खजूर सिरप, मध किंवा अगदी थोडी साखर वापरू शकता. वेलची पावडर, केशर आणि पिस्ता-बदाम टाकून ही स्वादिष्ट आणि आरोग्यदायी खीर सर्व्ह करा.9 / 9 गाजराची खीर हा एक लोकप्रिय आणि स्वादिष्ट गोड पदार्थ आहे. किसलेले गाजर तुपात हलकेच परतून घ्या. उकळलेल्या दुधात परतून घेतलेले गाजर घाला. खीर मंद आचेवर शिजवा आणि गाजर पूर्णपणे मऊ झाल्यावर त्यात दाटपणा आणण्यासाठी थोडा खवा किंवा मिल्क पावडर घाला. गोडव्यासाठी गुळ किंवा खजूर पावडर वापरा. वेलची पावडर, केशर आणि ड्रायफ्रूट्स घालून ही रंगीत आणि पौष्टिक खीर गरम सर्व्ह करा. गाजराची खीर पौष्टिक असल्याने आपण मनसोक्त खाऊ शकता.