Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल

Updated:November 14, 2025 15:02 IST2025-11-14T14:48:05+5:302025-11-14T15:02:10+5:30

Turmeric Coffee : टर्मरिक कॉफीचा एक हटके ट्रेंड पाहायला मिळत आहे. या कॉफीचे शरीराला असंख्य फायदे होतात.

Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल

बरेच लोक दिवसाची सुरुवात कॉफी पिऊन करतात. मात्र त्यात कॅफिनचं प्रमाण जास्त असतं, जे शरीरासाठी हानिकारक असू शकते. म्हणूनच आता टर्मरिक कॉफीचा एक हटके ट्रेंड पाहायला मिळत आहे. या कॉफीचे शरीराला असंख्य फायदे होतात.

Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल

आयुर्वेदात हळद त्याच्या अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मांसाठी आणि हीलिंग प्रॉपर्टीजसाठी ओळखली जाते. कॉफीमध्ये हळद घातल्याने तुम्हाला फक्त एनर्जी मिळणार नाही तर इतर अनेक फायदे देखील आहेत. त्याबाबत जाणून घेऊया...

Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल

एका कपमध्ये आधी कॉफी फेटून घ्या, नंतर एका भांड्यात दूध घ्या. त्यात थोडी हळद घालून गरम करा. जेव्हा कॉफी चांगली फेटली जाईल तेव्हा त्यात गरम हळदीचं दूध घालून मिक्स करा. अशा प्रकारे हटर्मरिक कॉफी तयार होईल.

Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल

हळदीमध्ये आढळणारं करक्यूमिन शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतं. कॉफीमधील अँटीऑक्सिडंट्स शरीराला डिटॉक्सिफाय करतात. टर्मरिक कॉफी जळजळ आणि थकवा कमी करते. नियमित सेवनाने सांधे दुखण्यापासून देखील आराम मिळतो.

Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल

करक्यूमिनचे अँटीऑक्सिडंट गुणधर्म हृदयाचं अनेक आजारांपासून संरक्षण करतात. हे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतं आणि कोलेस्टेरॉलची लेव्हल नियंत्रित करतं.

Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल

रिसर्चमधून असं दिसून आलं आहे की, हळदीचं नियमित सेवन धमन्यांमध्ये प्लाक जमा होण्यास रोखतं, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या आजारांचा धोका कमी होतो.

Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर टर्मरिक कॉफी नक्की प्या. हळदीमुळे शरीरातील मेटाबॉलिझ्म एक्टिव्ह होतं आणि फॅट्स वेगाने कमी होतात. कॉफीमधील कॅफिन उर्जेची पातळी वाढवतं, ज्यामुळे कॅलरी बर्न करणं सोपं होतं.

Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल

कॉफीमधील कॅफिन मानसिक सतर्कता आणि एकाग्रता वाढवतं, तर हळदीतील करक्यूमिन मेंदूच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतं. या दोघांचं मिश्रण मेंदूचे कार्य सुधारतं, अल्झायमर आणि पार्किन्सन सारख्या आजारांपासून वाचवतं.

Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल

हळदीचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तर कॉफीमधील क्लोरोजेनिक एसिड आणि कॅफेस्टोल रोगप्रतिकारक शक्तीला सपोर्ट करतात. टर्मरिक कॉफीमधील दोन्हीचे एकत्रित गुणधर्म शरीराला संसर्गांशी लढण्याची क्षमता देतात.

Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल

हळदी आणि कॉफी दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात जे फ्री रॅडिकल्सशी लढतात. टर्मरिक कॉफीचे नियमित सेवन त्वचेची नैसर्गिक चमक देखील वाढवते आणि सुरकुत्या कमी करते.