Gudhi Padwa 2026 : पीठ मळण्यापासून पुरी तळण्यापर्यंत ८ ट्रिक्स, पुऱ्या होतील कमी तेलकट-फुगतील टम्म
Updated:March 16, 2026 13:22 IST2026-03-15T16:19:23+5:302026-03-16T13:22:22+5:30
Gudi Padwa 2026 : पुरी तळताना तेल चांगलं गरम असावं. तेल कमी गरम असेल तर पुरी फुगत नाही खूप तेल पिते.

सणासुधीला नैवेद्यासाठी गरमागरम पुऱ्या केल्या जातात. गुढी पाडव्याला (Gudi Padwa 2026) अनेक घरांमध्ये श्रीखंड पुरीचा नैवेद्य दाखवला जातो. पण पुऱ्या जर तेलकट झाल्या किंवा फुगल्या नाही तर पुऱ्या खाण्याची मजाच जाते. (How To Make Perfect Puri At Home)
पुऱ्या परफेक्ट होण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. या टिप्स वापरून तु्म्ही सोप्या पद्धतीनं टम्म फुगलेल्या, पुऱ्या बनवू शकता. (Puri Making Tips)
पुऱ्यांचं पीठ मळताना चपातीच्या पिठापेक्षा जास्त घट्ट मळून घ्या. यात तुम्ही गव्हासोबत वाटीभर रवा घालू शकता. पीठ जितकं सैल असेल तितकंच पुरी जास्त तेल ओढून घेते.
पुरीचं पीठ मळताना पाण्याचा वापर कमी करा. पीठ मळताना त्यात १ चमचा कडकडीत गरम तेलाचं मोहन घातल्यास पुऱ्या छान खुसखुशीत होतात.
पीठ मळल्यानंतर ते फक्त १० ते १५ मिनिटं झाकून ठेवा. जास्त वेळ ठेवल्यास पीठ सैल पडतं आणि पुऱ्या तेलकट होतात.
पुऱ्या लाटताना पिठाचा वापर करू नका. त्याऐवजी पोळपाटाला थोडं तेल लावून पुऱ्या लाटून घ्या. कोरड्या पिठामुळे कढईतलं तेल जळतं आणि पुऱ्या काळपट दिसतात.
पुरी तळताना तेल चांगलं गरम असावं. तेल कमी गरम असेल तर पुरी फुगत नाही खूप तेल पिते.
पुरी तेलात सोडल्यावर झाऱ्याच्या साहाय्यानं हलबी दाबा ज्यामुळे छान फुगते. पुरी दोन्ही बाजूंनी गुलाबी रंगांवर तळून झाल्यावर ती उभ्या स्थितीत धरून जास्तीचं तेल निथळून घ्या.
तळलेल्या पुऱ्या नेहमीच किचन टिश्यू पेपरवर काढा. जेणेकरून उरलेलं अतिरिक्त तेल शोषलं जाईल. या टिप्स वापरून तुम्ही यंदाच्या पाडव्याला परफेक्ट पुऱ्या करू शकता.