फक्त २ मिनिटांत करा कुरकुरीत गार्लिक ब्रेड, एकदम सोपी रेसिपी- चव अगदी रेस्टॉरंटसारखीच...

Updated:April 13, 2026 14:33 IST2026-04-13T14:28:41+5:302026-04-13T14:33:08+5:30

फक्त २ मिनिटांत करा कुरकुरीत गार्लिक ब्रेड, एकदम सोपी रेसिपी- चव अगदी रेस्टॉरंटसारखीच...

गार्लिक ब्रेड आवडत असेल तर पुढे सांगितलेली एक अतिशय सोपी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पाहा. अगदी रेस्टॉरंटमध्ये ज्या चवीचा गार्लिक ब्रेड असतो, तशीच चव तुम्ही केलेल्या ब्रेडला येईल..

फक्त २ मिनिटांत करा कुरकुरीत गार्लिक ब्रेड, एकदम सोपी रेसिपी- चव अगदी रेस्टॉरंटसारखीच...

रेसिपी अतिशय सोपी असून त्यासाठी खूपच मोजके पदार्थ लागणार आहेत. सगळ्यात आधी तर लसूण घ्या आणि ते थोडे ठेचून घ्या.

फक्त २ मिनिटांत करा कुरकुरीत गार्लिक ब्रेड, एकदम सोपी रेसिपी- चव अगदी रेस्टॉरंटसारखीच...

साधारण १ चमचा ठेचलेला लसूण असेल तर ३ चमचे बटर घ्या... दोन्ही एका भांड्यात घेऊन एकत्र करा.

फक्त २ मिनिटांत करा कुरकुरीत गार्लिक ब्रेड, एकदम सोपी रेसिपी- चव अगदी रेस्टॉरंटसारखीच...

आता त्यामध्ये १ चमचा कडक तापलेलं तेल घाला. तेल घातल्याने बटर आणि लसूण छान एकजीव होतील. तसेच लसणाचा खूप छान फ्लेवर रेसिपीला येईल.

फक्त २ मिनिटांत करा कुरकुरीत गार्लिक ब्रेड, एकदम सोपी रेसिपी- चव अगदी रेस्टॉरंटसारखीच...

त्यानंतर त्यामध्ये थोडं ओरिगॅनो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. हे मिश्रण ब्रेडला लावून ते भाजून घ्या. खमंग गार्लिक ब्रेड तयार.