1 / 7उकडीचा मोदक हा आपल्या लाडक्या बाप्पाच्या आवडीचा पदार्थ. हा पदार्थ पारंपरिक पद्धतीने बनवला जातो. तांदळाची पिठी, ओले खोबरे आणि गुळाचे सारण भरून मोदक तयार केले जातात. पण अनेकदा तांदळाची उकड फारशी जमत नाही. कधी पीठ कच्चे राहते तर कधी खूप जास्त प्रमाणात शिजते. उकड नीट झाली नाही तर मोदक फुटतात, फाटतात किंवा चव बिघडते. (ukadiche modak dough)2 / 7जर आपलेही मोदक फुटत असतील किंवा उकड नीट जमत नसेल तर या सोप्या टिप्स फॉलो करा. यामुळे उकड परफेक्ट येईल आणि मोदक पांढरेशुभ्र राहतील. (perfect modak tips)3 / 7सगळ्यात आधी एका पातेल्यात त्यात दीड कप पाणी आणि दीड कप दूध घाला. उकळी आल्यानंतर चिमूटभर मीठ घाला. मंद आचेवर ठेवून त्यात मोदकाची पिठी घाला. गॅसचे फ्लेम कमी आचेवर ठेवून चमच्याने व्यवस्थित पीठ एकजीव करा. गॅस बंद करुन त्यावर १० मिनिटे झाकण ठेवा. ज्यामुळे पिठाला चांगली उकड मिळेल. 4 / 7मोदकाची पिठी तयार करताना सुवासिक तांदळाचा वापर करा. यात आपण बासमती, आंबेमोहर, सोना मसूरी घेऊ शकतो. खूप जुना किंवा अगदी नवीन तांदूळ घेऊ नका. इंद्रायणी तांदूळ शक्यतो वापरणे टाळा. 5 / 7तांदळाची पिठी करताना तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. चाळणीवर १० मिनिटे ठेवा, ज्यामुळे त्यातील पाणी निघून जाईल. त्यानंतर कॉटनच्या कपड्यावर पसरवून घ्या. हवेखाली व्यवस्थित २ तास सुकू द्या. उन्हामध्ये सुकवू नका. त्यानंतर गिरणीमध्ये बारीक दळून आणा. 6 / 7आता उकडवलेल्या तांदळाची पीठ ताटात घेऊन गरम असताना मळा. मॅशर घेऊन पीठ व्यवस्थित मॅश करा. आता पाण्यात हात भिजवून गरम पिठी मळून घ्या. जितके छान मळाल तितकी छान तांदळाची उकड तयार करा. खूप पाणी लावून उकड मळू नका. 7 / 7मोदक तयार करताना हाताला तूप लावून पु्न्हा एकदा पीठाचा छोटा गोळा मळून घ्या. यानंतर मोदकाला सुंदर कळ्या पाडून त्यात सारण भरुन वाफवा. ज्यामुळे मोदक फुटणार नाही, फाटणार नाही आणि कळ्या देखील व्यवस्थित येतील.