तळलेले फराळाचे पदार्थ अजिबात तेलकट होणार नाही, घ्या ८ टिप्स - तेल वाचवा, करा तेल न पिणारे कुरकुरीत पदार्थ...

Updated:October 8, 2025 17:06 IST2025-10-08T16:53:44+5:302025-10-08T17:06:02+5:30

Fried diwali faral food will not be oily at all, follow these 8 tips - save oil, make crispy dishes that don't absorb oil : फराळाच्या पदार्थांचा तेलकटपणा कमी करण्यासाठी काही खास टिप्स पाहूयात...

तळलेले फराळाचे पदार्थ अजिबात तेलकट होणार नाही, घ्या ८ टिप्स - तेल वाचवा, करा तेल न पिणारे कुरकुरीत पदार्थ...

दिवाळीत हमखास प्रत्येक घरोघरी फराळ तयार केला जातो. फराळात आपण शंकरपाळी, चिवडा, करंजी आणि चकली असे अनेक पदार्थ मोठ्या हौसेने करतो. फराळातील हे सगळेच पदार्थ खमंग, खुसखुशीत आणि तोंडाला पाणी आणणारे असले तरी, ते तयार करताना एकच मोठी चिंता असते - ती म्हणजे पदार्थ जास्त तेलकट होणे. जर पदार्थ जास्त तेल शोषून घेत असतील, तर ते चवीला तर बिघडतातच, पण आरोग्यासाठीही हानिकारक ठरतात.

तळलेले फराळाचे पदार्थ अजिबात तेलकट होणार नाही, घ्या ८ टिप्स - तेल वाचवा, करा तेल न पिणारे कुरकुरीत पदार्थ...

फराळाचे वेगवेगळे पदार्थ तयार करताना ते कुरकुरीत, खुसखुशीत होण्यासोबतच त्यांचा तेलकटपणा देखील कमी व्हावा यासाठी काही खास टिप्स पाहूयात.

तळलेले फराळाचे पदार्थ अजिबात तेलकट होणार नाही, घ्या ८ टिप्स - तेल वाचवा, करा तेल न पिणारे कुरकुरीत पदार्थ...

या काही घरगुती टिप्सच्या मदतीने, फराळाच्या पदार्थांचा तेलकटपणा कमी होण्यास मदत मिळते.

तळलेले फराळाचे पदार्थ अजिबात तेलकट होणार नाही, घ्या ८ टिप्स - तेल वाचवा, करा तेल न पिणारे कुरकुरीत पदार्थ...

फराळाचे पदार्थ तळण्यासाठी तेल मध्यम ते जास्त गरम (Medium to High Hot) असावे. तेल जर पुरेसे गरम नसेल, तर पदार्थ तेलात टाकल्यावर ते जास्तीचे तेल शोषून घेतात आणि तेलकट होतात.

तळलेले फराळाचे पदार्थ अजिबात तेलकट होणार नाही, घ्या ८ टिप्स - तेल वाचवा, करा तेल न पिणारे कुरकुरीत पदार्थ...

चकली किंवा शंकरपाळीचे पीठ जास्त सैल भिजवू नका. सैल पीठ जास्त तेल शोषून घेते. पीठ नेहमी घट्ट आणि दाबून मळा.

तळलेले फराळाचे पदार्थ अजिबात तेलकट होणार नाही, घ्या ८ टिप्स - तेल वाचवा, करा तेल न पिणारे कुरकुरीत पदार्थ...

कढईत एकावेळी जास्त पदार्थ तळण्यासाठी घालू नका. जास्त पदार्थ एकदम टाकल्यास तेलाचे तापमान लगेच खाली येते, ज्यामुळे पदार्थ तेल शोषून घेतात आणि जास्त तेलकट होतात, नेहमी छोट्या - छोट्या बॅचेसमध्ये पदार्थ तळा.

तळलेले फराळाचे पदार्थ अजिबात तेलकट होणार नाही, घ्या ८ टिप्स - तेल वाचवा, करा तेल न पिणारे कुरकुरीत पदार्थ...

पदार्थ तळले गेल्यावर त्यांना लगेच झाऱ्यामध्ये काढून, कढईच्या कडेवर हलके दाबून त्यातील जास्तीचे तेल काढून घ्या.

तळलेले फराळाचे पदार्थ अजिबात तेलकट होणार नाही, घ्या ८ टिप्स - तेल वाचवा, करा तेल न पिणारे कुरकुरीत पदार्थ...

तळलेले पदार्थ लगेच एका टिश्यू पेपरवर काढून ठेवा. यामुळे शिल्लक राहिलेले तेल शोषले जाते. टिश्यू पेपर थोड्या - थोड्या वेळाने बदलत रहा.

तळलेले फराळाचे पदार्थ अजिबात तेलकट होणार नाही, घ्या ८ टिप्स - तेल वाचवा, करा तेल न पिणारे कुरकुरीत पदार्थ...

गरम पदार्थ एकावर एक रचून ठेवू नका. अशा पद्धतीत पदार्थ वाफेमुळे मऊ पडतात आणि तेलकट होऊ शकतात. ते थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात भरा.

तळलेले फराळाचे पदार्थ अजिबात तेलकट होणार नाही, घ्या ८ टिप्स - तेल वाचवा, करा तेल न पिणारे कुरकुरीत पदार्थ...

एखादा फराळाचा पदार्थ तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा चुकूनही वापरु नका. जास्त वेळा वापरलेलं तेल जर वारंवार वापरले तर पदार्थ अधिक जास्त तेलकट होण्याची शक्यता असते.

तळलेले फराळाचे पदार्थ अजिबात तेलकट होणार नाही, घ्या ८ टिप्स - तेल वाचवा, करा तेल न पिणारे कुरकुरीत पदार्थ...

पदार्थ तळताना आपण गरम तेलात चमचाभर कॉर्न फ्लॉवर, मीठ घालू शकता. यासोबतच २ ते ३ टुथपिकच्या काड्या देखील गरम तेलात घालून पदार्थ तळून घ्यावेत. यामुळे पदार्थ जास्तीचे तेल न पिता, अजिबात तेलकट होत नाहीत.