फिल्टर कॉफी की कोल्ड कॉफी? उन्हाळ्यात घरीच करा कॉफीचे ६ प्रकार, महागड्या कॅफेपेक्षा भारी

Updated:April 24, 2025 20:15 IST2025-04-24T20:09:30+5:302025-04-24T20:15:07+5:30

Filter coffee or cold coffee? 6 types of coffee to make at home in summer : तुम्हाला कोणत्या प्रकारची कॉफी आवडेत? आता विकत नका घेऊ घरीच करा पाहा विविध प्रकार.

फिल्टर कॉफी की कोल्ड कॉफी? उन्हाळ्यात घरीच करा कॉफीचे ६ प्रकार, महागड्या कॅफेपेक्षा भारी

आजकाल कॉफी प्रेमींचे प्रमाण वाढले आहे. अनेक अभ्यासांमधून हे ही सिद्ध झाले आहे की कॉफी जर योग्य प्रमाणात प्यायली तर पचनासाठी फार जड नाही. चहापेक्षा कॉफी पिणे आरोग्यासाठी चांगले असते.

फिल्टर कॉफी की कोल्ड कॉफी? उन्हाळ्यात घरीच करा कॉफीचे ६ प्रकार, महागड्या कॅफेपेक्षा भारी

बाहेर कॅफेला जाऊन कॉफी पिण्यासाठी भरपूर खर्च करावा लागतो. सगळ्याच प्रकारच्या कॉफी घरी करणे शक्य नाही. त्यासाठी वेगळे कॉफी मशीन वापरल्या जातात.

फिल्टर कॉफी की कोल्ड कॉफी? उन्हाळ्यात घरीच करा कॉफीचे ६ प्रकार, महागड्या कॅफेपेक्षा भारी

मात्र काही कॉफीचे प्रकार आहेत जे घरी करता येणे अगदीच शक्य आहे तसेच सोपे आहे. रोज त्याच प्रकारची कॉफी पिऊन कंटाळा आला असेल तर या पद्धती करुन बघा.

फिल्टर कॉफी की कोल्ड कॉफी? उन्हाळ्यात घरीच करा कॉफीचे ६ प्रकार, महागड्या कॅफेपेक्षा भारी

फिल्टर कॉफी तर सगळे आवडीने पितात. त्याची खास पावडर बाजारामध्ये मिळते. कॉफी पावडरमध्ये गरम पाणी ओता थोडावेळ ठेवा. नंतर त्यामध्ये दूध साखर घाला. ढवळा आणि प्या.

फिल्टर कॉफी की कोल्ड कॉफी? उन्हाळ्यात घरीच करा कॉफीचे ६ प्रकार, महागड्या कॅफेपेक्षा भारी

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोल्ड कॉफी प्यायला मज्जाच येते. कॉफी तयार करताना बर्फ वापरा तसेच चॉकलेट सिरपही वापरु शकता. मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आणि मस्त गारेगार प्यायची.

फिल्टर कॉफी की कोल्ड कॉफी? उन्हाळ्यात घरीच करा कॉफीचे ६ प्रकार, महागड्या कॅफेपेक्षा भारी

मोका कॉफी हा एक प्रसिद्ध प्रकार आहे. ही कॉफी बाहेर भरपूर महाग मिळते. मात्र घरी अगदी विकत सारखी करता येते. कॉफीमध्ये कोको पावडरही घालायची. चॉकलेट घालायचे. फेटून मिक्स करायचे.

फिल्टर कॉफी की कोल्ड कॉफी? उन्हाळ्यात घरीच करा कॉफीचे ६ प्रकार, महागड्या कॅफेपेक्षा भारी

कपामध्ये कॉफी पावडर बरोबर मध दालचिनी घालून फेटून घ्या. त्यामध्ये पाणी दूध साखर घाला. मस्त ढवळून घ्या. हनी सिनेमन कॉफी करायला अगदीच सोपी आहे.

फिल्टर कॉफी की कोल्ड कॉफी? उन्हाळ्यात घरीच करा कॉफीचे ६ प्रकार, महागड्या कॅफेपेक्षा भारी

मसाला चहा तुम्ही प्यायला असेल. पण कधी मसाला कॉफी प्यायला आहात का? त्यासाठी कॉफीमध्ये जायफळ, सुंठ, दालचिनी घाला. साधी कॉफी करता तशीच प्रोसेस करा.

फिल्टर कॉफी की कोल्ड कॉफी? उन्हाळ्यात घरीच करा कॉफीचे ६ प्रकार, महागड्या कॅफेपेक्षा भारी

डालगोना कॉफी लॉकडाऊनमध्ये केली की नाही? नक्कीच केली असेल. कॉफीला फेस सुटेपर्यंत फेटून घ्यायची. मग तुम्हाला गार हवी तर त्यामध्ये बर्फ घाला. किंवा तशीच प्या.