बाजारात ‘फेक मँगो’ची चर्चा! आपण खराखुराच आंबा खातोय, कसं ओळखाल?
Updated:May 22, 2025 18:11 IST2025-05-22T18:06:28+5:302025-05-22T18:11:20+5:30
'fake mangos' in the market! How do you know if you are eating real mango? : आंबा विकत घेताना पारखूनच घ्यायचा. खराब आंबा अजिबात घेऊ नका. या टिप्स लक्षात ठेवा आणि आजिबात फसू नका.

आंबा हा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. आंब्याला प्रचंड मागणी असते. मागणी वाढली की पुरवठा वाढतो हा साधा नियम आपल्याला माहिती आहे. मात्र मागणी वाढली की भेसळही वाढते आणि दर्जा ढसाळतो हे ही तितकेच खरे.
आंबा हे शेवटी फळ आहे. फळे नैसर्गिक असल्याने ती खराब होतात. त्यांच्यावर अनेक गोष्टींचा परिणाम होतो. काही विक्रेतेही जास्त पैसा कमावण्याच्या नादात खराब फळ विकतात. मात्र काही साध्या गोष्टी लक्षात ठेवा आणि आंबा विकत घेताना चांगलाच निवडा.
चांगल्या दर्जाचा आंबा मऊ असतो. टणक झालेला नसतो. त्याचा आकार नीट पाहायचा. त्याला लहानसे टोक असते. आंब्याचा आकार प्रकारानुसार बदलतो फळांचा आकार सारखाच असू शकत नाही. एकाच पेटीत विविध आकाराचे आंबे असतात. मात्र आकार चांगला असला पाहिजे.
आकाराला अगदीच मोठा असलेला आंबा नैसर्गिक असेलच असे नाही. किंवा अति सुंदर दिसणारा आंबा शक्यतो नैसर्गिकरित्या वाढवलेला नसतो. त्यात रसायने असतात. म्हणूनच त्यावर एकही डाग नसतो किंवा त्याचा आकार साध्या आंब्यापेक्षा फारच मोठा असतो.
आंब्याचा सुगंध लांबूनही येतो. मात्र वाईट दर्जाच्या आंब्याला जरा वेगळा वास येतो. त्याला रसायनांसारखा वास येतो. अगदी छान ताज्या आंब्याचा वास त्यापेक्षा वेगळा असतो. त्यामुळे आंबा घेताना वास घेऊन पाहायचा.
घरी आणल्यावर आंबा पाण्यात ठेवायचा. पाण्यात आंबा बुडला तर तो चांगला आहे असे समजून जायचे. मात्र आंबा जर तरंगला तर तो चांगला नक्कीच नाही. त्यात रसायने असल्याने तो तरंगतो. नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा तरंगत नाही त्याला वजन असते.
आंबा टोकाशी दाबून पाहायचा फारच जास्त मऊ असेल तर आतून खराब असण्याची शक्यता आहे. आंबा मऊच असतो मात्र किडलेला आंबा अगदीच मऊ असतो. हाताला लगेच फरक जाणवेल.
अकाली पावसानंतर आंबा आणखी खराब यायची शक्यता जास्त आहे. तसेच भावही जास्त होईल. त्यामुळे आंबा विकत घेताना काळजी घ्या. चांगला नैसर्गिक आंबाच घ्या.