५ प्रकारची भजी खा मस्त, कांदा बटाटा भजी -चमचमीत पार्टीच जशी घरच्याघरी
Updated:May 7, 2025 19:38 IST2025-05-07T19:34:28+5:302025-05-07T19:38:41+5:30
Eat 5 types of Pakoda, a party-like delight at home : या प्रकारची भजी कधी खाल्ली का? पाहा किती मस्त प्रकार आहेत. करायला अगदी सोपे.

मस्त चमचमीत पदार्थ खायची इच्छा झाल्यावर असा चटकन करता येणारा पदार्थ म्हटल्यावर लगेच डोक्यात भजीच येते. तळणीत एकदा भजी सोडली की छान खमंग वास घरभर सपरतो. मग पटापट सगळ्यांचे हात भजीच्या दिशेने जातात आणि अगदी चटकन सगळ्या संपून जातात.
विकतची भजी फारच तेलकट असते. त्यामुळे घरी करुन खाणेच चांगले आहे. भजी म्हटल्यावर आपण कांदा बटाट्याचाच विचार करतो मात्र इतरही काही प्रकार असतात.
बटाटा भजी तर सगळ्यांच्या माहितीची आहे. करायला अगदीच सोपी आणि एकदा का तळायला घेतली की मग बटाटे संपेपर्यंत खाल्ली जाते.
कांदा भजी करायची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. मात्र चवीला ही भजी छानच लागते. अगदी कुरकुरीत करुन घ्यायची. सॉसशी खा किंवा चटणीशी मज्जा येतेच.
कोथिंबीर घातलेली बोंडा भजी करायला अगदीच सोपी असते. मस्त मऊ व खुसखुशीत होते. जास्त तेलकटही होत नाही.
सिमला मिरचीची भजी अगदीच छान लागते. मस्त कुरकुरीत होते. सिमला मिरचीची चव काही तरी औरच लागते. ज्यांना ही भाजी आवडत नाही त्यांनाही भजी नक्की आवडेल.
केळीची भजी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी केली जाते. चवीला गोड लागणारी ही भजी इतर भजीसारखीच करायची. सोपी असते.
पालकाची भजी एकदा खाल्ली की पुन्हा नक्की कराल. मस्त हिरवी अशी ही भजी भरुनही करतात आणि फक्त पाने तळूनही करतात.