पुऱ्या तेलकट होतात-तळल्यानंतर वातड होतात? ७ टिप्स, मस्त टम्म फुगतील

Updated:October 2, 2025 17:13 IST2025-10-01T12:13:07+5:302025-10-02T17:13:18+5:30

Dusshera 2025 (Kami telkal puri kashi karavi) : पुरी तेलात घातल्यानंतर झाऱ्यानं हलक्या दाबून फुगवा आणि नंतर पलटून घ्या.

पुऱ्या तेलकट होतात-तळल्यानंतर वातड होतात? ७ टिप्स, मस्त टम्म फुगतील

दसऱ्याच्या (Dusshera 2025)दिवशी अनेक घरांमध्ये पुऱ्या केल्या जातात पण पुऱ्या वातड होतात व्यवस्थित होत नाहीत अशी बऱ्याचजणांची तक्रार असते. पुरी करण्यासाठी काही खास ट्रिक्स वापरल्या तर तुमचं काम सोपं होईल आणि कमी तेलकट, मस्त फुगलेल्या पुऱ्या होतील. (How To Make Puri Less Oily Puri Making Tips)

पुऱ्या तेलकट होतात-तळल्यानंतर वातड होतात? ७ टिप्स, मस्त टम्म फुगतील

पुऱ्यांसाठी कणीक घट्ट मळा. कारण कणीक सैल असेल तर पुऱ्या फुगत नाहीत. (Dusshera Special Puri Making Tips)

पुऱ्या तेलकट होतात-तळल्यानंतर वातड होतात? ७ टिप्स, मस्त टम्म फुगतील

कणीक मळताना त्यात दोन चमचे बारीक रवा आणि दोन चमचे गरम तेलाचं मोहन घाला. रवा कुरकुरीतपणा देतो आणि मोहन तेल पिण्यापासून वाचवते.

पुऱ्या तेलकट होतात-तळल्यानंतर वातड होतात? ७ टिप्स, मस्त टम्म फुगतील

कणकेत मीठ जास्त झाल्यास पुऱ्या तेलकट होतात त्यामुळे कमीत कमी प्रमाणात मीठ घाला.

पुऱ्या तेलकट होतात-तळल्यानंतर वातड होतात? ७ टिप्स, मस्त टम्म फुगतील

पुरी तळण्यासाठी तेल चांगलं गरम करा. तेल थंड असल्यास पुरी जास्त तेल शोषून घेते.

पुऱ्या तेलकट होतात-तळल्यानंतर वातड होतात? ७ टिप्स, मस्त टम्म फुगतील

पुरी तेलात घातल्यानंतर झाऱ्यानं हलक्या दाबून फुगवा आणि नंतर पलटून घ्या.

पुऱ्या तेलकट होतात-तळल्यानंतर वातड होतात? ७ टिप्स, मस्त टम्म फुगतील

एकावेळी कढईत दोन किंवा तीनपेक्षा जास्त पुऱ्या घालू नका. यामुळे तेलाचं तापमान कमी होतं आणि पुऱ्या नीट तळल्या जात नाहीत.

पुऱ्या तेलकट होतात-तळल्यानंतर वातड होतात? ७ टिप्स, मस्त टम्म फुगतील

तळलेल्या पुऱ्या टिश्यू पेपर किंवा साध्या पेपरवर काढा ज्यामुळे अतिरिक्त तेल शोषलं जाईल.