पाहा ‘ही’ ७ अत्यंत मोलाची फळं, त्यांची सालं म्हणजे लाखमोलाची गोष्ट! फेकली तर १०० % पस्तावाल..
Updated:March 10, 2025 20:03 IST2025-03-10T19:42:56+5:302025-03-10T20:03:48+5:30
Do you throw away the peels of fruits and vegetables? then don't.. they are useful : फळांच्या आणि भाज्याच्या सालांमध्येही असतात उपयुक्त घटक. सालं फेकण्याआधी विचार करा.

सर्वच फळांना सालं असतात. काहींची सालं आपण खातो, काहींची साले सोलून टाकून देतो आणि फक्त गर खातो. तसेच अनेक भाज्यांनाही सालं असतात. ती ही सोलून टाकून देतो.
काही फळांची सालं ही विविध प्रकारे वापरता येतात. ती टाकायची गरज नाही.
असे पदार्थ जाणून घ्या, ज्यांच्या सालांचाही वापर करता येतो. त्वचेसाठी, खाण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी त्यांचा वापर होतो.
संत्र आपण सोलूनच खातो. संत्र्याच्या सालांचा वापर त्वचेसाठी करता येतो. संत्र्याची साले वाळवून ठेवायची नंतर ती अनेक प्रकारे वापरता येतात. स्वच्छतेसाठीही वापरता येतात.
केळ्याच्या सालांचा हेअर मास्क तयार करता येतो. केसांच्या आरोग्यासाठी तो फार चांगला असतो. ही सालं चेहऱ्यावर घासल्याने टॅनिंगही कमी होते.
काकडीच्या सालांमध्येही विविध गुणधर्म असतात. त्या सालांचा वापर चेहऱ्यासाठी करता येतो. तसेच त्वचेवर जर उन्हामुळे डाग आले असतील तर, ही सालं चोळून डाग कमी करता येतात.
कलिंगडाच्या सालाची भाजी तयार करता येते. चवीला छान लागते. तयार करायलाही फार सोपी असते.
बटाट्याची साले चेहर्यासाठी तसेच त्वचेसाठी चांगली असतात . त्यामध्ये फायबर असते. पोटॅशियम असते.
सफरचंदाच्या सालांचाही चेहर्यासाठी उपयोग करता येतो. त्यामध्ये अरसोलिक अॅसिड असते. ज्याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी होतो.
पडवळाच्या सालापासून चविष्ट अशी चटणी तयार करता येते. अगदी साधी फोडणी देऊन ही चटणी तयार होते.