Join us

गुलाबजाम- रसगुल्ल्याचा पाक फेकून न देता करा झटपट ५ पदार्थ, पाक वाया न जाता चविष्ट पक्वान्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2025 17:40 IST

1 / 6
सणसमारंभात घरी पाहुणे मंडळी आली की आपण गुलाबजाम किंवा रसगुल्ला विकत आणतो किंवा घरी बनवतो. गोडाचे पदार्थ लगेच फस्त होतात पण त्याचा पाक उरतो. अनेकदा हा उरलेला पाक आपण फेकून देतो. पण अशावेळी हा उरलेला पाक फेकून देण्याऐवजी काही गोड, खमंग, खुसखुशीत पदार्थ बनवले तर ते अधिक चविष्ट होतील. (Diwali mithai recipe)
2 / 6
या पदार्थांमुळे उरलेला पाक वायाही जाणार नाही व त्यापासून काहीतरी नवीन पदार्थ बनवता येतील. (leftover gulab jamun syrup recipes)
3 / 6
आपल्याला सगळ्यात आधी पाक पूर्णपणे गाळून घ्यायला हवा. त्यानंतर रवा भाजून घ्या. त्यात साखर घालण्याऐवजी पाक घाला. ज्यामुळे रव्याचे पुडिंग किंवा शिरा तयार होईल.
4 / 6
पाकापासून आपण गोड पुरी बनवू शकतो. पाकात थोडे पाणी घालून पातळ करा. गोड पुरीचे पीठ मळून त्यात पाक घालून कणिक मळा. पुरी लाटून तळून घ्या.
5 / 6
पाकापासून आपण विविध प्रकारच्या मिठाई बनवू शकतो. यात आपण बर्फी, गुजिया, बालुशाही, लाडू किंवा हलवा बनवू शकतो.
6 / 6
आपल्याकडे पाक खूप जास्त प्रमाणात उरला असेल तर त्याची साखर बनवू शकतो. यासाठी पाक कडवून घ्या. सुकल्यानंतर त्याचा पावडर बनेल. थंड झाल्यानंतर एका डब्यात भरा. चहा किंवा सरबतमध्ये याचा वापर करता येईल.
टॅग्स : दिवाळी २०२५अन्नपाककृती