Join us

करंज्या तेलात फुटतात, मऊ पडतात? ७ टिप्स - होतील खुसखुशीत, एकही करंजी फुटणारी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2025 11:33 IST

1 / 9
दिवाळी म्हटलं की, रोषणाई, आतेषबाजी आणि फराळ. यामध्ये सगळ्यांचा आवडता आणि आवर्जून केला जाणारा गोडाचा पदार्थ म्हणजे करंजी. करंजीशिवाय फराळ अपूर्ण आहे. पण अनेकदा करंजी बनवताना ती नरम पडते, तेलात जाऊन फुटते.(Diwali Faral tips)
2 / 9
कधी कधी करंजी वातड होते किंवा कडक होते. त्यामुळे मग सगळाच गोंधळ उडतो. तेल खराब होते आणि मेहनतही वाया जाते. आपल्यासोबतही असंच होत असेल तर या ७ टिप्स कायम लक्षात ठेवा.(Karanji recipe tips)
3 / 9
करंजीचे सारण हे थंड झाल्याशिवाय करंजीत भरू नका. गरम सारणामुळे कणकेचा भाग मऊ होतो आणि फ्राय करताना तो फुटतो.
4 / 9
कणिक खूप मऊ झाले असेल तर करंजी चिकटते आणि तेलात फुटते. आणि खूप कडक झाली तर ती व्यवस्थित बंद होत नाही. त्यासाठी कणिक मळताना त्यात गरम मोहन, रवा किंवा तूप घाला. ज्यामुळे कुरकुरीतपणा येईल.
5 / 9
करंजीच्या कडा बंद करताना नखांचा वापर करु नका. यासाठी काट्याच्या मागच्या बाजूने किंवा बोटांनी नीट दाबा. हवा आत राहिली तर ती तेलात फुटते.
6 / 9
तेलाचे तापमान योग्य रित्या पाहा. खूप जास्त तेल तापले असेल तर ती लगेच तडकते आणि आतून कच्ची राहते. तेल खूप थंड असेल तर कंरजीत शोषले जाते. त्यासाठी तेलात पीठाचा छोटा गोळा घाला. तो वर आला की, समजावे तेल व्यवस्थित आहे.
7 / 9
करंजी बनवून झाल्यावर तळण्यापूर्वी झाकताना कोरडं सुती कापड वापरा. दमट कापडाने झाकल्यास ओलावा वाढतो आणि कणिक मऊ होऊन फुटते.
8 / 9
करंजी एकावेळी तेलात जास्त टाकू नका. यामुळे तेलाचे तापमान कमी होऊन त्या फुटतात.
9 / 9
फ्राय करण्यापूर्वी करंजी ५ मिनिटं फ्रीजमध्ये ठेवा. त्यामुळे ती घट्ट होते आणि फ्राय करताना फुटत नाही.
टॅग्स : दिवाळी २०२५अन्नपाककृती