Diwali 2025 : न चिकटणारे बेसनाचे मऊ लाडू करण्याच्या १० टिप्स, परफेक्ट होतील लाडू

Updated:October 7, 2025 17:24 IST2025-10-07T16:35:18+5:302025-10-07T17:24:36+5:30

Diwali 2025 (Halwaistyle Besan Ladoo) : भाजलेलं बेसन गरम असतानाच गुठळ्या मोडून घेण्यासाठी मोठ्या चाळणीनं चाळून घ्या.

Diwali 2025 : न चिकटणारे बेसनाचे मऊ लाडू करण्याच्या १० टिप्स, परफेक्ट होतील लाडू

दिवाळी (Diwali 2025) म्हटलं की बेसनाचा लाडू आलाच! अनेकदा लाडू हवातसा दाणेदार होत नाही किंवा बेसन टाळूला चिकटतं तर कधी लाडू वळताच येत नाही. परफेक्ट बेसनाचा लाडू करण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. (How To Make Besan Ladoo)

Diwali 2025 : न चिकटणारे बेसनाचे मऊ लाडू करण्याच्या १० टिप्स, परफेक्ट होतील लाडू

लाडूसाठी जाडसर किंवा रवाळ बेसनाची पीठ वापरा यामुळे लाडू दाणेदार होतो आणि टाळूला चिकटत नाही. हरभऱ्याची डाळ हलकी भाजून मग थंड करून दळून आणा. (Beasan Ladoo Recipe)

Diwali 2025 : न चिकटणारे बेसनाचे मऊ लाडू करण्याच्या १० टिप्स, परफेक्ट होतील लाडू

बेसन भाजण्यासाठी जाड बुडाची कढई वापरा म्हणजे बेसन खाली लागणार नाही आणि सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजलं जाईल. (Halwaistyle Besan Ladoo)

Diwali 2025 : न चिकटणारे बेसनाचे मऊ लाडू करण्याच्या १० टिप्स, परफेक्ट होतील लाडू

बेसन मंच आचेवर भाजून घ्या. बेसन भाजत असताना ते तूप शोषून घेते. मग जसजसं बेसन भाजत जाईल तसतसं तूप थोडं थोडं करून घाला. एकाचवेळी जास्त तूप घालू नका.

Diwali 2025 : न चिकटणारे बेसनाचे मऊ लाडू करण्याच्या १० टिप्स, परफेक्ट होतील लाडू

बेसन चांगलं भाजून झाल्यावर आणि तुपामध्ये व्यवस्थित एकजीव झाल्यावर गॅस बंद करण्यापूर्वी १ ते २ दुधाचा हबका मारा. नंतर बेसन परतून घ्या. यामुळे बेसनाला दाणेदार टेक्स्चर येते.

Diwali 2025 : न चिकटणारे बेसनाचे मऊ लाडू करण्याच्या १० टिप्स, परफेक्ट होतील लाडू

भाजलेलं बेसन गरम असतानाच गुठळ्या मोडून घेण्यासाठी मोठ्या चाळणीनं चाळून घ्या.

Diwali 2025 : न चिकटणारे बेसनाचे मऊ लाडू करण्याच्या १० टिप्स, परफेक्ट होतील लाडू

बेसनाचे आणि सारखेचे प्रमाण अचूक असावे. तुम्ही जितकं बेसन घ्या त्याच्या अर्धे किंवा चवीनुसार थोडी कमी साखर वापरा. ५०० ग्रॅम बेसन असले तर २५० ते ३०० ग्रॅम पिठीसाखर वापरा.

Diwali 2025 : न चिकटणारे बेसनाचे मऊ लाडू करण्याच्या १० टिप्स, परफेक्ट होतील लाडू

भाजेललं बेसन पूर्ण गार झाल्यानंतरच त्यात साखर घाला. कारण गरम बेसनात साखर घातल्यास ती वितळले आणि लाडू वळता येत नाहीत.

Diwali 2025 : न चिकटणारे बेसनाचे मऊ लाडू करण्याच्या १० टिप्स, परफेक्ट होतील लाडू

बेसन आणि साखरेचं मिश्रण एकजीव झाल्यावर जर लाडू वळण्यासाठी मिश्रण कोरडं वाटत असेल तर कढईत १ ते २ चमचे गरम केलेलं तूप घालून मिसळा त्यानंतर लगेच लाडू वळा.

Diwali 2025 : न चिकटणारे बेसनाचे मऊ लाडू करण्याच्या १० टिप्स, परफेक्ट होतील लाडू

मिश्रण खूपच पातळ असेल आणि लाडू वळता येत नसतील तर त्यात २ ते ३ चमचे भाजलेला रवा किंवा बेसनाचे पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या. नंतर लाडू वळा.