घरीच झटपट करा विकतसारखी कुरकुरीत बटाटा भजी; ५ टिप्स- सोडा न घालताही फुगतील भजी
Updated:August 30, 2025 16:08 IST2025-08-30T15:22:58+5:302025-08-30T16:08:04+5:30
Crispy Batata Bhaji Recipe : बेसनाचे पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावे जास्त पातळ पीठ असेल तर भजी मऊ पडते

नैवेद्याच्या पदार्थांमध्ये भजी नेहमीच बनवली जाते. कांदा भजी, गिलक्याची भजी, बटाट्याची भजी असे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. घरात केलेली भजी परफेक्ट बनत नाही, फुगत नाही अशी अनेकांची तक्रार असते (Cooking Hacks). बटाटा भजी करण्याची सोपी रेसिपी पाहूया. या पद्धतीनं तुम्ही बटाटा भजी केली तर टम फुगेल आणि रूचकर लागेल. (How To Make batata Bhaji)
बटाट्याची भजी करण्यासाठी चकत्या पातळ करा. जितक्या पातळ चकत्या असतील तितकीच भजी कुरकुरीत लागेल.
बटाट्याच्या चकत्या काहीवेळ पाण्यात भिजवून ठेवा. ज्यामुळे त्यातील स्टार्च निघून जाईल.
भजी तळण्यासाठी तेल जास्त गरम किंवा थंड नसावे. तेल गरम झाल्यानंतर मध्यम आचेवर भजी तळा.
बेसनाचे पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावे जास्त पातळ पीठ असेल तर भजी मऊ पडते.
बेसनाच्या पीठात तुम्ही २ ते ३ चमचे तांदळाचे पीठ वापरू शकता ज्यामुळे भजी जास्त कुरकुरीत होते.
पीठ तयार करताना कोणाताही सोडा वापरू नका. एकावेळी कढईत जास्त भजी घालू नका. अन्यथा भजी मऊ पडतात.