चहासाठी गाईचं दूध चांगलं की म्हशीचं? 5 टिप्स-उत्तम चवीचा फक्कड चहा घरीच बनेल...
Updated:September 1, 2025 18:53 IST2025-09-01T18:44:15+5:302025-09-01T18:53:57+5:30
Cow or Buffalo Milk Which One Is Better For Making Tea : जास्त दूध घातल्यानं चहाची चव बिघडू शकते म्हणून योग्य प्रमाणातच दूध घाला. १ कप चहासाठी अर्धा कप दूध घाला.

चहा (Tea) फक्त पिण्याचा पदार्थ नाही तर भारतातील संस्कृतीचा एक भाग आहे. प्रत्येक व्यक्तीच्या दिवसाची सुरूवात चहासोबतच होते. संध्याकाळचा किंवा सकाळचा थकवा दूर करण्यासाठी चहा उत्तम ठरतो. (Which Milk Is Good Cow Or Buffalo For Tea)
चहाची चव ही दुधावर अवलंबून असते. दुधाचा रंग, चव यानुसार चहाची चव ठरते. किती प्रमाणात दूध घालता, कोणतं दूध घालता हे फार महत्वाचं असतं.
गायीचं दूध हलक असतं. पचायलाही जड नसतं. यात फॅट्स कमी असतात. यापासून बनलेला चहा सुगंधित आणि आरोग्यासाठी उत्तम असते.
म्हशीच्या दुधात फॅट्स जास्त असतात ज्यामुळे चहा घट्ट, क्रिमी बनतो. जे लोक असा चहा पिणं पसंत करतात त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
जास्त दूध घातल्यानं चहाची चव बिघडू शकते म्हणून योग्य प्रमाणातच दूध घाला. १ कप चहासाठी अर्धा कप दूध घाला.
गायीच्या दुधासोबत कमी चहा पावडर, तुळस-आलं चांगले लागते. म्हशीच्या दुधासोबत तुम्ही मसालेदार चहा वेलची, लवंग, दालचिनी घालून बनवू शकता ज्यामुळे चहा जास्त स्वादीष्ट लागतो.
डायबिटीस किंवा कोलेस्टेरॉलच्या रुग्णांसाठी गाईचे दूध उत्तम ठरते. एनर्जी आणि फुलनेस राहण्यासाठी म्हशीचं दूध उत्तम ठरतं.