लोखंडी कढईत करा ‘या’ भाज्या, अगदी आजी करायची तशी होते भाजी, वाढेल हिमोग्लोबिन भरभर

Updated:June 27, 2025 19:19 IST2025-06-26T14:41:52+5:302025-06-27T19:19:43+5:30

Cooking Tips : तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, लोखंडाच्या कढईमध्ये काही गोष्टी करण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यातून अनेक पोषक तत्व मिळतात.

लोखंडी कढईत करा ‘या’ भाज्या, अगदी आजी करायची तशी होते भाजी, वाढेल हिमोग्लोबिन भरभर

वेगवेगळ्या घरांमध्ये भाज्या बनवण्यासाठी वेगवेगळ्या भांड्यांचा वापर केला जातो. कुणी अॅल्यूमिनिअमची भांडी वापरतात, तर कुणी लोखंडी किंवा स्टीलची वापरतात. पण काही अशा भाज्या असतात ज्या केवळ लोखंडी कढईमध्ये करणं जास्त प्रभावी मानलं जातं. इतकंच नाही तर या भाज्या लोखंडी कढईत केल्या तर त्यांमधील पोषक तत्वही वाढतात.

लोखंडी कढईत करा ‘या’ भाज्या, अगदी आजी करायची तशी होते भाजी, वाढेल हिमोग्लोबिन भरभर

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, लोखंडाच्या कढईमध्ये काही गोष्टी करण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यातून अनेक पोषक तत्व मिळतात. अशाच काही भाज्या लोखंडी कढईत केल्या तर त्यांच्यातील पोषण वाढतं.

लोखंडी कढईत करा ‘या’ भाज्या, अगदी आजी करायची तशी होते भाजी, वाढेल हिमोग्लोबिन भरभर

लोखंडी कढईमध्ये भाजी बनवली तर टेस्ट आणखीन चांगली लागते. सगळ्याच भाज्यांबाबत असं होत नाही. तुम्ही भेंडीची भाजी लोखंडी कढईत करू शकता. लोखंडी कढईतून नॅचरल आयर्न मिळतं, जे आरोग्यासाठी चांगलं असतं. सोबतच लोखंडी कढईत भेंडी चिकटत नाही आणि कुरकुरीत होते.

लोखंडी कढईत करा ‘या’ भाज्या, अगदी आजी करायची तशी होते भाजी, वाढेल हिमोग्लोबिन भरभर

कारले आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. जर तुम्ही कारल्याची भाजी लोखंडी कढईत केली तर त्यातील कडवटपणा कमी होतो. सोबतच आरोग्यासाठी सुद्धा हे फायदेशीर ठरतं. कारल्यामध्ये आयर्नचं प्रमाण वाढतं. तसेच बॉडी डिटॉक्स करण्यासही मदत मिळते.

लोखंडी कढईत करा ‘या’ भाज्या, अगदी आजी करायची तशी होते भाजी, वाढेल हिमोग्लोबिन भरभर

जर तुम्ही मेथी आणि बटाट्याची भाजी बनवत असाल तर लोखंडी कढईत करू शकता. यानं मेथीला चांगली टेस्ट येईल आणि त्यातील कडूपणा कमी होईल. तसेच त्यात आयर्नही येईल. ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते.

लोखंडी कढईत करा ‘या’ भाज्या, अगदी आजी करायची तशी होते भाजी, वाढेल हिमोग्लोबिन भरभर

दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं. तेच जेव्हा ही भाजी लोखंडी कढईत बनवली जाते तेव्हा त्याची टेस्ट वाढते आणि पोषक तत्वही वाढते. यातील एल्कलाइन नेचर आयर्नला योग्यपणे अॅब्जॉर्ब करण्यास मदत करतं. दुधी भोपळ्याची भाजी लिव्हर आणि किडनी डिटॉक्ससाठी सुद्धा चांगली असते.