आहारात असायलाच हवा दुधी भोपळा, पाहा किती उपयुक्त आहे आरोग्यासाठी

Updated:May 12, 2025 11:36 IST2025-05-12T11:29:39+5:302025-05-12T11:36:55+5:30

Bottle Gourd is a must in your diet, see how beneficial it is for health : दुधी भोपळा खाणे आरोग्यासाठी फार फायद्याचे ठरते. उन्हाळ्यात तर खायलाच हवा.

आहारात असायलाच हवा दुधी भोपळा, पाहा किती उपयुक्त आहे आरोग्यासाठी

विविध भाज्या खाणे आरोग्यासाठी गरजेचे असते. काही भाज्या आपण आवडीने खात नाही. मात्र त्या आपल्यासाठी उपयुक्त असतात. दुधी भोपळा खाणे फार चांगले ठरते. भाजी, पराठा असे पदार्थ करुन नक्की खा.

आहारात असायलाच हवा दुधी भोपळा, पाहा किती उपयुक्त आहे आरोग्यासाठी

तसे दुधी भोपळा बारमाही मिळणारी भाजी आहे. त्याची लागवड फेब्रुवारी ते जूनच्या दरम्यान केली जाते. ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये मस्त ताजा दुधी खायला मिळतो. इतरही महिन्यांमध्ये पिक घेतले जातेच.

आहारात असायलाच हवा दुधी भोपळा, पाहा किती उपयुक्त आहे आरोग्यासाठी

उन्हाळ्यात दुधीची भाजी खाणे फार उपयुक्त ठरते. त्यात पाण्याचे प्रमाण भरपूर असते. तसेच त्यात फायबर असते. जीवनसत्वे असतात. त्यात खनिजेही असतात. विविध गुणधर्मांनी दुधी परिपूर्ण असतो.

आहारात असायलाच हवा दुधी भोपळा, पाहा किती उपयुक्त आहे आरोग्यासाठी

दुधीत फायबर असल्याने पचनाची क्रिया फार चांगली होते. बद्धकोष्टता तसेच अपचन, गॅस असे काही त्रास होत नाहीत. पचनाची प्रक्रिया अगदी छान होते.

आहारात असायलाच हवा दुधी भोपळा, पाहा किती उपयुक्त आहे आरोग्यासाठी

डिटॉक्सची प्रक्रिया करण्यासाठी दुधीची शरीराला मदत होते. तसेच लिव्हरच्या आरोग्यासाठीही दुधीचा रस चांगला असतो. लिव्हरचे कार्य सुधारते.

आहारात असायलाच हवा दुधी भोपळा, पाहा किती उपयुक्त आहे आरोग्यासाठी

दुधीत जीवनसत्त्व सी असते. तसेच अँण्टी ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे त्वचेसाठी तसेच केसांसाठी दुधी फार चांगला असतो. केसांच्या आरोग्यासाठी दुधी फारच पौष्टिक असतो.

आहारात असायलाच हवा दुधी भोपळा, पाहा किती उपयुक्त आहे आरोग्यासाठी

दुधीत पाण्याचे प्रमाण भरपूर असते. कॅलरीज अगदी कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठीही दुधी खाणे फायद्याचे ठरते.

आहारात असायलाच हवा दुधी भोपळा, पाहा किती उपयुक्त आहे आरोग्यासाठी

दुधी भोपळा खाणे हा मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी मस्त उपाय आहे. रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्याचे काम दुधीच्या रसातील सत्व करतात.