घरी रोज चपात्या करण्यासाठी सर्वात चांगला गहू कोणता? मऊ चपात्यांसाठी निवडा परफेक्ट गहू
Updated:February 2, 2026 13:35 IST2026-02-01T17:04:18+5:302026-02-02T13:35:56+5:30
Best Wheat Varieties For Soft And Fluffy Chapatis : महाराष्ट्रात चपातीसाठी लोकवन हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. याचे दाणे मोठे आणि जाड असतात. ज्यामुळे चपाती मऊ होते आणि बराचवेळ टिकते.

मऊसूत आणि लुसलुशीत चपात्या होण्यासाठी गव्हाची निवड अत्यंत महत्वाची असते. उत्तम चपातीसाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. (Best Wheat Varieties For Soft And Fluffy Chapatis)
महाराष्ट्रात चपातीसाठी लोकवन हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. याचे दाणे मोठे आणि जाड असतात. ज्यामुळे चपाती मऊ होते आणि बराचवेळ टिकते. (Secret To Soft Chapatis Choose Right Wheat Type)
मध्य प्रदेशातील सीहोरी भागातील गव्हाला सरबती म्हणतात. हा गहू नैसर्गिकरित्या गोड असतो आणि त्याच्या पिठात पाण्याचे प्रमाण धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे चपात्या अत्यंत लुसलुशीत होतात.
खपली गहू हा आरोग्यासाठी उत्तम आणि पचायला हलका असला तरी याची चपाती मऊ राहण्यासाठी कणीक व्यवस्थित भिजवणं आवश्यक असते.
गहू निवडताना तो स्वच्छ, चकचकीत आणि किड न लागलेला असावा. जुना झालेला किंवा ओलावा असलेला गहू वापरल्यास चपाती कडक होऊ शकते.
अनेकजण जण लोकवन किंवा सरबती गहू सम प्रमाणात घेऊन एकत्र करून दळतात. ज्यामुळे चवीला गोड आणि पोत एकदम मऊ होतो.
गव्हाचं पीठ खूपच बारीक किंवा जाड दळू नये. मध्यम दळण असेल तर चपाती छान फुलते.
रेडीमेड गव्हाचं पीठ आणून त्याची चपाती करण्यापेक्षा गहू विकत आणून व्यवस्थित साफ करून मग पीठ दळून घ्या.