Join us

पुरी-भजी, समोसे खाल्ले तरी वाढणार नाही कोलेस्टेरॉल! 'या' तेलात तळा, तब्येत राहील एकदम फिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2025 19:05 IST

1 / 7
सण-समारंभ म्हटलं तळणं आलेच. पुरी, भजी, समोसा असे पदार्थ पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटतं. पण यामुळे तब्येत बिघडण्याची आणि कोलेस्टेरॉल वाढण्याची भीती देखील मनात नेहमी असते. (best oil for frying)
2 / 7
अनेकदा तळण्यासाठी आपण चुकीचे तेल वापरतो ज्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम तर होतोच पण पदार्थ देखील लवकर खराब होतात. जाणून घेऊया तळण्यासाठी कोणते तेल सगळ्यात चांगले आहे. (healthy oil for deep frying)
3 / 7
आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण ऑलिव्ह ऑइलचा वापर करतो. पण हे फक्त सॅलड किंवा फूड ड्रेसिंगसाठी चांगल असतं. पुऱ्या किंवा तळण्याचे पदार्थ यामध्ये तळू नये.
4 / 7
पुरी किंवा इतर कोणतेही पदार्थ तळण्यासाठी शेंगदाण्याचे तेल वापरायला हवे. हे तेल फास्ट गॅसवर गरम केले तरी यातील पोषक घटक नष्ट होत नाही.
5 / 7
भाज्या शिजवण्यासाठी सगळ्यात चांगलं तेल कच्च्या घाणीचे. तसेच यासाठी आपण मोहरीचे तेल, पिवळे किंवा काळे तेल देखील वापरु शकतो.
6 / 7
रिफाइंड किंवा पाम तेल आरोग्यासाठी हानिकारक असते. यामुळे उच्च कोलेस्टेरॉलची समस्या वाढून हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
7 / 7
पुरी किंवा तळलेल्या पदार्थांसाठी योग्य तेल निवडणे महत्त्वाचे आहे. तळण्यासाठी ऑलिव्ह ऑइल किंवा रिफाइंड तेल टाळा.
टॅग्स : अन्नकिचन टिप्स