1 / 8बाजारांतून विकत आणलेले लालचुटुक डाळिंब खायला सगळ्यांनाचं आवडतात. परंतु ही डाळिंब बराच काळ तशीच ठेवली तर याची साल सुकून जाते. साल सुकल्याने आतील डाळिंबाचे दाणे देखील हळुहळु सुकून ड्राय होऊ लागतात. यामुळे डाळिंबाच्या दाण्यातील रस कमी होऊन ते फारसे ज्यूसी लागत नाहीत. एकूणच या डाळिंबातील ओलावा निघून जाऊन ते कोरडे, रुक्ष बनते. अशा सुकलेल्या डाळिंबाच्या साली सोलून त्यातून दाणे काढणे फार अवघड काम असते. अशावेळी सुकलेल्या डाळिंबाची साल कशी काढावी तसेच त्यातून दाणे झटपट काढण्यासाठीच्या काही सोप्या ट्रिक्स(Quick & Easy Way to Peel Pomegranate).2 / 8डाळिंबाची साल जर कोरडी, रुक्ष झाली असेल तर आधी डाळिंबाचे दोन तुकडे करुन घ्यावेत. त्यानंतर थंड पाण्यात डाळींब १५ ते २० मिनिटे बुडवून ठेवावे. आता या थंड पाण्याच्या बाऊलमध्येच डाळिंबाचे दाणे काढून घ्यावे. थंड पाण्यामुळे डाळिंबाची साल मऊ पडून लगेच निघते. 3 / 8सुकून कोरडी, रुक्ष झालेली डाळिंबाची साल काढणे कठीण होते. अशावेळी डाळिंब २० ते ३० सेकंदांसाठी मायक्रोव्हेवमध्ये हलकेच गरम करुन घ्यावे. साल गरम झाल्याने ती थोडीशी मऊ होते यामुळे डाळिंबाच्या साली पटकन निघण्यास मदत होते. 4 / 8डाळिंबाची साल फारच सुकली असेल आणि सुरीने देखील कापता येत नसेल तर व्हिनेगर वापरा. यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात १ टेबलस्पून व्हिनेगर मिसळा. या पाण्यात डाळिंब २० ते ३० मिनिटे भिजवत ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून ते कापून घ्यावे. व्हिनेगरच्या मदतीने डाळिंबाची सालं मऊ होण्यास मदत होते. 5 / 8 जर डाळिंबाची साल खूपच कडक झाली असेल तर ते डाळिंब १५ ते २० मिनिटे फ्रीजरमध्ये ठेवा. डाळिंब फ्रिजरमध्ये ठेवल्याने त्याची साल थोडीशी थंड होऊन मऊ पडून पटकन निघेल. 6 / 8डाळिंब कापून त्याचे दोन भागात विभाजन करा. अर्धे कापलेले डाळिंब उलटे करा, जेणेकरून कापलेला भाग खालच्या दिशेला असेल. आता चमच्याच्या मदतीने डाळिंबावर हलक्या हाताने मारा. या सोप्या ट्रिकमुळे सालीला चिकटलेले डाळिंबाचे दाणे अगदी लगेच निघून सहज खाली बाऊलमध्ये पडतील. 7 / 8साल रुक्ष, कोरडी, कठीण झालेल्या डाळिंबातून दाणे काढण्यासाठी लाटण्याचा वापर करु शकता. डाळिंब कापण्याआधी लाटण्याच्या मदतीने हलकेच दाब देत डाळिंब लाटून घ्यावे. किंवा डाळिंबाला हलकेच लाटणीने बाहेरुन टँपिंग करावे. त्यानंतर डाळिंब कापून घ्यावे. यामुळे डाळिंबाची साल सुकली असली तरीही डाळिंबाचे दाणे अगदी सहज निघतात. 8 / 8 डाळिंबाची साल जर सुकून कोरडी, रुक्ष झाली असेल तर असे डाळिंब कापणे सहज शक्य होत नाही. अशावेळी डाळिंब सहजपणे कापण्यासाठी धारदार सुरीचा वापर करावा.