उन्हाळा स्पेशल थंडगार - चटपटीत रायत्याचे ७ प्रकार ! जेवण होईल झक्कास - पोटाला मिळेल नैसर्गिक थंडावा....
Updated:April 10, 2025 14:46 IST2025-04-10T14:33:40+5:302025-04-10T14:46:38+5:30
Summer Essential 7 Easy Raita Recipes To Refresh Rehydrate & Rejuvenate : 7 Refreshing Raita Recipes To Try This Summer : 7 Raita Recipes To Beat The Summer Heat : 7 Easy & Quick Raita Recipes : नेहमीचे तेच ते बुंदी रायता करण्यापेक्षा रायत्याचे हे वेगवेगळे प्रकार नक्की चाखून पाहा...

उन्हाळ्यात पोटाला थंडावा मिळावा आणि वारंवार (7 Easy & Quick Raita Recipes) काहीतरी थंड खाण्याची इच्छा होतेच. अशावेळी आपण दही, ताक अशा वेगवेगळ्या थंडगार ( 7 Refreshing Raita Recipes To Try This Summer) पदार्थांचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करतो.
दही, ताक यासोबतच आपण जेवणासोबत तोंडी (7 Raita Recipes To Beat The Summer Heat) लावायला म्हणून वेगवेगळ्या चवीचे रायते देखील करु शकतो. आपण सगळेच नेहमीचे बुंदी रायते अगदी आवडीने खातो. परंतु या बुंदी रायत्याशिवाय आपण इतर कोणकोणत्या प्रकारचे रायते करु शकतो ते पाहूयात.
१. काकडी रायता :-
काकडी आणि दही असे पदार्थ उन्हाळ्यात खाल्लेच पाहिजेत. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. काकडी रायता करण्यासाठी काकडीचे लहान तुकडे करून किंवा किसून घ्यावी. थंडगार दह्यात काकडी घालून मग त्यात चवीनुसार मीठ, जिरेपूड, पुदिन्याची पाने, हिरव्या मिरच्या असे सगळे पदार्थ घालावेत. काकडी रायता खाण्यासाठी तयार आहे.
२. टोमॅटो - कांदा रायता :-
टोमॅटो - कांदा रायता, रायत्याचा हा प्रकार शक्यतो पुलाव - बिर्याणी किंवा पराठ्यांसोबत खाल्ला जातो. यासाठी, बारीक चिरून घेतलेले कांदा - टोमॅटो दह्यात मिक्स करून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, चिमूटभर लाल तिखट मसाला, मीठ घालावे. सगळे जिन्नस एकत्रित करून खाण्यासाठी रायता सर्व्ह करा.
३. कच्ची कैरी - पुदिना रायता :-
थंडगार दह्यात किसलेली कैरी आणि पुदिन्याची बारीक चिरलेली पानं घालावीत. त्यात चवीनुसार मीठ व जिरेपूड घालून मस्त आंबट - गोड रायतं, चवीला खूपच छान लागत. वरण - भात, चपाती सोबत देखील तोंडी लावायला म्हणून तुम्ही हे रायतं खाऊ शकता.
४. फ्रुट रायता :-
वेगवेगळ्या रंगीबेरंगी फळांच फ्रुट रायते दिसायलाच इतकं सुंदर असत की ते पाहून खाण्याचा मोह आवरता येतच नाही. सफरचंद, केळी, डाळिंब, अननस, पपई यांसारख्या फळांचे लहान तुकडे किंवा काप थंडगार दह्यात घालून मिक्स करावे. मग त्यावरून आपल्या आवडीनुसार चाट मसाला, मीठ किंवा मध घालावे. खाण्यासाठी तयार आहे रंगीबेरंगी फ्रुट रायता.
५. गाजर - बीटरुट रायता :-
किसलेले गाजर - बीट एकत्रित करून त्यात दही घालावे. त्यानंतर चवीनुसार मीठ व जिरेपूड घालूंन हे लालचुटुक रायतं जेवणांसोबतच तोंडी लावायला कोशिंबीर सारखे खाऊ शकता.
६. कांदा पुदिन्याचा रायता :-
सर्वात आधी कांदा बारीक चिरुन घ्यावा. पुदिन्याची पानं मिक्सरमधून बारीक वाटावीत. भांड्यात दही घेऊन ते फेटून घ्यावं. फेटलेल्या दह्यात चिरलेला कांदा, पुदिन्याची पेस्ट, मीठ, जिरे पावडर, चाट मसाला, लाल तिखट घालावं. हे रायतं खाण्यआधी फ्रिजमध्ये ठेवून थंडं करावं.
७. हिरव्या मिरचीचा रायता :-
एका भांड्यात दही घ्यावं. त्यात साखर घालून ते फेटावं. कढईत तेल गरम करावं. गरम तेलात हिरवी मिरची घालावी. ही मिरचीची फोडणी दह्यात घालावी. मीठ आणि जिरे पावडर घालून रायता चांगला हलवून घ्यावा. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.